घरदेश-विदेशRajeev Kumar : मुख्य निवडणूक आयुक्तांना झेड दर्जाची सुरक्षा; आयबीला मिळाले धमकीचे...

Rajeev Kumar : मुख्य निवडणूक आयुक्तांना झेड दर्जाची सुरक्षा; आयबीला मिळाले धमकीचे इनपूट

Subscribe

केंद्र सरकारने मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना देशभरातील केंद्रीय राखीव पोलीस दलाची (CRPF) झेड श्रेणीची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. आयबीच्या माहितीच्या आधारे गृह मंत्रालयाने त्यांना सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना देशभरातील केंद्रीय राखीव पोलीस दलाची (CRPF) झेड श्रेणीची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. आयबीच्या माहितीच्या आधारे गृह मंत्रालयाने त्यांना सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय निवडणूक आयोगाने गृह मंत्रालयाकडे मागणी केली आहे की बंगालमध्ये निमलष्करी दलाच्या 100 अतिरिक्त कंपन्या सुरक्षेसाठी तैनात कराव्यात जेणेकरून निवडणुका कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय पार पाडता येतील. (Lok Sabha Election 2024 Z grade security to Chief Election Commissioner Rajeev Kumar IB received threat inputs )

केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी त्यांच्या अहवालात राजीव कुमार यांना अधिक मजबूत सुरक्षा देण्याची शिफारस केली होती. त्यानुसार राजीव कुमार यांच्यासह सशस्त्र कमांडोंचे पथक देशभरात तैनात करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार गृह मंत्रालयाकडून सीआरपीएफच्या 55 ​​आणि बीएसएफच्या 45 जवानांची तुकडी तैनात करण्यात येणार आहे. तसेच निमलष्करी दलाच्या 100 अतिरिक्त तुकड्या 15 एप्रिल किंवा त्यापूर्वी तैनात करण्याचे आदेश निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले आहेत. याआधी बुधवारी निवडणूक आयोगाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची बैठक बोलावली होती. यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.

- Advertisement -

हेही वाचा – BJP : नकली शिवसेना घेऊन सोनिया गांधींना शरण गेले, बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका

पश्चिम बंगालमध्ये अतिरिक्त सैन्य तैनात

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांमध्ये हिंसाचाराचा मोठा इतिहास आहे. यंदा पश्चिम बंगालमध्ये 42 जागांसाठी 7 टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्याचे मतदान 19 एप्रिल रोजी होणार असून शेवटच्या टप्प्याचे मतदान 1 जून रोजी होणार आहे. तर 4 जूनला निकाल लागणार आहे. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत टीएमसीने राज्यात 22 जागा जिंकल्या होत्या, तर भाजपाने 18 जागा जिंकल्या होत्या. मात्र यंदा भाजपा जिंकणार असल्याचा दावा केला जात आहे. पश्चिम बंगाल, ओडिशा आणि तेलंगणामध्ये भाजपा सर्वाधिक जागा जिंकेल, असा अंदाज निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे निवडणुकांच्या काळात पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार होऊ नये, यासाठी अतिरिक्त सैन्य तैनात करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

- Advertisement -

राजीव कुमार कोणा?

राजीव कुमार हे देशाचे 25 वे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. 1984 च्या बॅचचे आयएएस अधिकारी राजीव कुमार यांनी माजी मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांची जागा घेतली आहे. यापूर्वी ते निवडणूक आयुक्तही राहिले आहेत. राजीव कुमार यांनी भारत सरकारमध्येही अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. राजीव कुमार हे बिहार आणि झारखंड कॅडरचे आयएएस होते आणि ते 2020 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : महाराष्ट्रात नरेंद्र मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे असा सामना, संजय राऊतांचा दावा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -