घरमहाराष्ट्रBJP : नकली शिवसेना घेऊन सोनिया गांधींना शरण गेले, बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर...

BJP : नकली शिवसेना घेऊन सोनिया गांधींना शरण गेले, बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Subscribe

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्ववादी भूमिका सोडल्यामुळे उद्धव ठाकरे यांना शिवसेनेमधून शिवसैनिकांनीच तडीपार केले. ते आता नकली शिवसेना घेऊन सोनिया गांधी यांना शरण गेले आहेत. त्यामुळेच तुकडे गॅंगचा म्होरक्या असलेल्या काँग्रेसचा जाहीरनामा देखील उद्धव ठाकरे यांना प्रिय वाटत आहे, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

मुंबई : चंद्रपूरमधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला ‘नकली शिवसेना’ संबोधले होते. त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी, भाजपाचा उल्लेख ‘भ्रष्टाचाऱ्यांचा पक्ष’ असा करून पलटवार केला आहे. तर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा ठाकरे यांच्या पक्षाचा ‘नकली शिवसेना’ असा उल्लेख केला आहे. (Lok Sabha Election 2024: Criticism-counter-criticism between Thackeray group and BJP)

भाजपा आता भ्रष्टाचाऱ्यांचा पक्ष झालेल आहे. त्या पक्षाकडे कोणताही आदर्श राहिलेला नाही. त्यांना शिवसेनाही गुजरातला पळवायची होती, मात्र मी ती पळवू दिली नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी आज, मंगळवारी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत केली. भाजपा हा खंडणीखोरांचा पक्ष असून ‘चंदा दो धंदा लो’ असे धोरण या पक्षाचे आहे, असा टोला त्यांनी इलेक्टोरल बॉण्ड प्रकरणावरून लगावला.

- Advertisement -

त्यासंदर्भात आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीट केले आहे. महाभ्रष्टाचारी आघाडीने ज्यांच्या नेतृत्वात अडीच वर्षे राज्याला लुटले ते उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करीत आहेत, हा एक मोठा विनोद आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना खंडणीवसुली गॅंग कोण चालवत होते? हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Thackeray Vs Modi : सूर्यग्रहण, अमावास्या आणि मोदींची सभा,असा वाईट योग बऱ्याच दिवसांनंतर देशाने पाहिला – उद्धव ठाकरे

खरंतर, शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्ववादी भूमिका सोडल्यामुळे उद्धव ठाकरे यांना शिवसेनेमधून शिवसैनिकांनीच तडीपार केले. ते आता नकली शिवसेना घेऊन सोनिया गांधी यांना शरण गेले आहेत. त्यामुळेच तुकडे गॅंगचा म्होरक्या असलेल्या काँग्रेसचा जाहीरनामा देखील उद्धव ठाकरे यांना प्रिय वाटत आहे, अशी टीका करतानाच, उद्धव ठाकरे यांनी हे लक्षात ठेवावे 2014, 2019 प्रमाणे यंदाही राहुल गांधी यांना जनता मतदानातून धडा शिकणार आहे आणि 4 जूननंतर तुम्हालाही घरात बसून राहण्याचे आवडते काम करावे लागेल, असा टोला त्यांनी लगावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -