घरमनोरंजन‘द ब्रोकन न्यूज सीझन 2’चा ट्रेलर लाँच; सोनाली बेंद्रे, श्रिया पिळगावकर मुख्य...

‘द ब्रोकन न्यूज सीझन 2’चा ट्रेलर लाँच; सोनाली बेंद्रे, श्रिया पिळगावकर मुख्य भूमिकेत

Subscribe

एप्रिल 2024 – ZEE5 या भारतातील सर्वात मोठ्या एतद्देशीय व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि बहुभाषिक कंटेंट निर्मिती करणाऱ्या प्लॅटफॉर्मने ‘द ब्रोकन न्यूज’ या बहुप्रतीक्षीत सीरीजच्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर आज प्रदर्शित केला. बीबीसी स्टुडिओजच्या ‘प्रेस’ या फॉरमॅटवर आधारित असलेल्या या शोचं दिग्दर्शन विनय वायकुळ यांनी केलं असून संबित मिश्रा यांनी त्याचं लिखाण केलं आहे. नव्या सीझनमध्ये सोनाली बेंद्रे, जयदीप अहलावत आणि श्रिया पिळगावकर त्यांच्या अमीना कुरेशी, दिपांकर सन्याल आणि राधा भार्गव या भूमिकांमध्ये परत एकदा पाहायला मिळतील. दोन वर्षांच्या कालावधीनंतर येत असलेल्या या नव्या सीझनमध्ये ‘जोश 24×7’ आणि ‘आवाज भारती’ या चॅनेल्समधला तत्वांचा झगडा नव्या पातळीवर जाताना पाहायला मिळेल. 3 मे रोजी केवळ ZEE5 वर याचे प्रीमियर होणार आहे. या थरारक नव्या सीझनमध्ये सत्य आणि सनसनी यांच्यातलं युद्ध न्यूजरूमच्या पलीकडे जात वैयक्तिक पातळीवर अस्तित्वाच्या लढ्यात रुपांतरित होताना दिसेल.

बीबीसी स्टुडिओज प्रॉडक्शन इंडियाची निर्मिती असलेल्या आगामी सीझनमध्ये काल्पनिक आयुष्य, खोटेपणा, प्रेम आणि पत्रकारांमधला संघर्ष, सत्य व सनसनीखेजपणासाठी त्यांच्यात चालणारा झगडा दाखवण्यात आला आहे. आगामी सीझनमध्ये फैजल रशीद, इंद्रनील सेनगुप्ता, संजीता भट्टाचार्य, तोरुक रैना यांच्या व्यक्तीरेखा परत पाहायला मिळतील. त्याशिवाय नव्या सीझनमध्ये अक्षय ओबेरॉय, सुचित्रा पिल्लई आणि गीतिका विद्या ओहल्यान हे नवे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसतील.

- Advertisement -

दुसऱ्या सीझनच्या ट्रेलरमध्ये सन्यालमुळे तुरुंगात खितपत पडलेली राधा जामीनावर बाहेर येते. ती पुनरागमन करण्यासाठी, दिपांकर आणि त्यांचे डावपेच संपवून ब्रॉडकास्ट क्षेत्र परत सुरळीत करण्याचा निश्चय तिनं केला आहे. केवळ तटस्थपणे बातम्यांचं वार्तांकन करून ‘जोश 24×7’ शी लढा देता येणार नाही हे लक्षात आल्यानं ती भ्रष्ट यंत्रणेशी दोन हात करण्यासाठी चाकोरीबाहेरच्या पद्धतींचा अवलंब करायचा ठरवते. राधाच्या अनुपस्थितीमध्ये अमीनानं सत्याचा लढा एकटीच्या खांद्यावर घेतलेला असतो. वैयक्तिक जोखीम घेऊन ती सत्य समोर आणण्यासाठी रस्त्यावर उतरलेली असते. दिपांकरच्या ‘सनसनी’ बातम्यांचं टीआरपीवर वर्चस्व असतं, मात्र सार्वजनिक मतप्रवाह वळवण्यासाठी तसंच वैयक्तिक आणि कॉर्पोरेट हित साधण्यासाठी त्याला सनसनी विचारसरणीचा वापर करावा लागत असतो. मात्र, एक प्रश्न कायम असतो आणि तो म्हणजे, ‘ब्रेकिंग न्यूजच्या शर्यतीत आता मोडणार प्रत्येक नियम. जेव्हा सत्य सुद्धा बनतं सनसनी, काय पाहाणार भारत?’


हेही वाचा : ‘निवेदिता माझी ताई’; निवेदिता आणि यशोधन यांच्या लग्नसोहळ्यात मोठा ट्विस्ट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -