घरमहाराष्ट्रभिवंडी इमारत दुर्घटनेत रोज वाढतोय मृतांचा आकडा; आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू

भिवंडी इमारत दुर्घटनेत रोज वाढतोय मृतांचा आकडा; आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू

Subscribe

भिवंडीतील वळपाडा परिसरात तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. आतापर्यंत या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 10 जणांना वाचवण्यात NDRF च्या पथकाला यश आलं आहे. आतापर्यंत 18 जणांना बाहेर काढलं आहे.

भिवंडीतील वळपाडा परिसरात तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. आतापर्यंत या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 10 जणांना वाचवण्यात NDRF च्या पथकाला यश आलं आहे. आतापर्यंत 18 जणांना बाहेर काढलं आहे. सध्या NDRF कडून शेवटची चाचपणी सुरु आहे. मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसंच, मुख्यमंत्री शिंदेंनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आहे. इमारत दुर्घटनेप्रकरणी इमारत मालक इंद्रपाल पाटीलला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   ( Bhiwandi Walpada Death rises in Bhiwandi building disaster 8 people died 10 people were saved )

इमारत बांधणाऱ्या मालकावर गुन्हा दाखल

नारपोली पोलिसांनी इमारत बांधणाऱ्या मालकावर गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 304(2), 337, 338 आणि 427 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंद्रपाल पाटील असे ताब्यात घेतलेल्या इमारतीच्या मालकाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाटील यांनी 2014 मध्ये ही इमारत बांधली असून बहुतांश खोल्या दुकानदार आणि रहिवाशांना भाड्याने देण्यात आल्या होत्या.

- Advertisement -

या इमारतीत तळ मजला आणि पहिल्या मजल्यावर एका कंपनीचं गोडाऊन होतं, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर रहिवासी खोल्या होत्या. ज्यात भाडेतत्वावर नागिरक राहत होते. या कमकुवात इमारतीत मोबाईल टाॅवर उभारण्यात आलं होतं. त्यामुळे इमारतीवर अतिरिक्त भार पडला होता.

( हेही वाचा: विकसित महाराष्ट्र घडवण्याचा आमचा प्रयत्न; महाराष्ट्र दिनी देवेंद्र फडणवीसांचं विधान )

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी घटनास्थळी भेट देऊन मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली तसेच जखमींवर उपचार करण्याचा खर्च राज्य शासनाच्या वतीने करण्यात येईल, असे सांगितले होते. भिवंडीत अनधिकृत आणि धोकादायक इमारतींच्या दुर्घटना नेहमीच घडत असतात. त्यामुळे या दुर्घटना थांबविण्यासाठी भिवंडीत क्लस्टर योजना राबविणे गरजेचे आहे, असे मत मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केले. यावेळी धोकादायक इमारतींचा सर्व्हे करून अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणार्‍या नागरिकांना राहण्याची पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्यासह भिवंडी मनपा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांना दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -