घरदेश-विदेशनवऱ्याला खांद्यावर घेऊन महिलेची गावभर धिंड काढणाऱ्या १३ जणांना अटक

नवऱ्याला खांद्यावर घेऊन महिलेची गावभर धिंड काढणाऱ्या १३ जणांना अटक

Subscribe

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. याप्रकरणाचा तपास करुन पोलिसांनी आतापर्यंत १३ जणांना अटक केली आहे.

मध्य प्रदेशच्या झबुआमध्ये मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत १३ जणांना अटक केली आहे. विवाहबाह्य संबंध असल्यामुळे झबुआ जिल्ह्यातील देवीगावमधील पंचायतीने महिलेला शिक्षा दिली. या महिलेला तिच्या पतीला खांद्यावर घेऊन गावभर धिंड काढली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. याप्रकरणाचा तपास करुन पोलिसांनी आतापर्यंत १३ जणांना अटक केली आहे.

अशी घडली घटना

विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलेची देवीगाव येथील गावकारांनी गावभर धिंड काढली. ही शिक्षा देताना या महिलेला तिच्या पतीला खांद्यावर घेऊन गावभर फिरवण्यात आले. या व्हिडिओचा संपूर्ण अभ्यास करुन पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये महिलेची गावभर धिंड काढत असताना तिच्या आसपास गावातील अनेक जण होते. काही तरुण जोरजोरत शिट्ट्या मारत नाचत, तर जण याची मजा घेत व्हिडिओ काढत होते. महिलेला प्रचंड दमली असता तिला चालण्यास जबरदस्ती केली जात होती.

- Advertisement -

व्हिडिओआधारे पोलिसांनी केली कारवाई

पोलिसांनी या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल केला. झाबुआ जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक विनीत जैन यांनी सांगितले की, महिलेचा अपमान करत तिला तिच्या पतीला खांद्यावर घेण्यास भाग पाडले. ही घटना आपत्तीजनक असून ती गंभीर आहे. या घटनेप्रकरणी व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे तपास केला.

इतर आरोपींचा शोध सुरु

याप्रकरणी सुरुवातीला पोलिसांनी दोन जणांना अटक केली. त्यानंतर हळूहळू इतर आरोपींना अटक करण्यात आली. आतापर्यंत १३ जणांना अटक करण्यात आली आहे. व्हिडिओत दिसणाऱ्या इतर आरोपींना अटक करण्याचा प्रयत्न सुरु आहे. असे सांगितले जात आहे की, झबुआ जिल्ह्यातली ही पहिली घटना नाही. याआधी २०१७ मध्ये अशाप्रकारची घटना समोर आली होती. त्यावेळी काही गावकऱ्यांनी एका ३२ वर्षीय महिलेला शिक्षा दिली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -