घरदेश-विदेशधक्कादायक! इव्हेंटसाठी २ मॉडेल्सना बोलवून केला सामूहिक बलात्कार

धक्कादायक! इव्हेंटसाठी २ मॉडेल्सना बोलवून केला सामूहिक बलात्कार

Subscribe

आरोपी महिलेसह तिच्या चार साथीदारांना केले अटक

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इंदूरमध्ये मुंबईतील दोन मॉडेलवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या मुंबईतील दोन मॉडेल्सना इव्हेंट असल्याचे सांगून त्यांना इंदूरला बोलावण्यात आले. त्यानंतर त्यांना एका खोलीत कोंडून ठेवले आणि त्यांच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार बाणगंगा परिसरात घडला असून पोलिसांनी या प्रकरणी एका महिलेसह अन्य चार तरुणांनाही अटक केल्याचे सांगण्यात येत आहे.

असा घडला प्रकार

२१ वर्षीय तरुणी आणि मुंबईची २२ वर्षीय तरुणी विजय नगर पोलीस ठाण्यात आल्या. त्यांनी त्या मॉडेलिंग करत असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी एका महिलेने फोन करून इंदूरमध्ये एका इव्हेंटमध्ये नृत्य सादर करण्याबाबत सांगितले आणि बोलावून घेतल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही तरुणी बसमधून १६ सप्टेंबरला इंदूरला पोहोचल्या. महिलेचा एक साथीदार तरूण त्यांना बाणगंगा परिसरातील एका इमारतीतील फ्लॅटमध्ये घेऊन गेला. इव्हेंट एक-दोन दिवसांत होईल असे महिलेने तरुणींना सांगितले.

- Advertisement -

कपडे फाडून अश्लील व्हिडिओ केले

इव्हेंटमधील काही व्यक्तींसोबत शारिरीक संबंध ठेवण्यासाठी आरोपी महिलेने तरुणींवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. तरुणींनी नकार दिल्यानंतर त्यांना डांबून ठेवले व मारहाण केली. तसेच त्यांना उपाशी ठेऊन त्यांच्या अंगावरील कपडे फाडून अश्लील व्हिडिओ काढले. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्यावर बलात्कार केला. उपाशी ठेवून त्यांच्यावर तीन दिवस अत्याचार केले.

आरोपी महिलेसह तिच्या चार साथीदारांना अटक

दरम्यान, एका तरुणीची प्रकृती बिघडल्यानंतर सोमवारी त्यांना धार येथे पाठवण्यात आले. तरुणींनी त्यांच्या तावडीतून सुटका करून घेतली आणि थेट धार पोलीस ठाणे गाठलं. व घडलेला सारा प्रकार पोलिसांना सांगितला. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेसह तिच्या चार साथीदारांना अटक केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -