घरट्रेंडिंग'वर्णद्वेष्टे' म्हणत गांधीजींचा पुतळा हटवला, वर कृतीचं समर्थन!

‘वर्णद्वेष्टे’ म्हणत गांधीजींचा पुतळा हटवला, वर कृतीचं समर्थन!

Subscribe

महात्मा गांधी वर्णद्वेष्टे असल्याचा दावा करत दक्षिण आफ्रिकेतल्या घाना देशाच्या आक्रा राजधानीतून महात्मा गांधींचा पुतळा हटवण्यात आला आहे.

महात्मा गांधी यांना भारतीयांमध्येच नाही तर संपूर्ण जगामध्ये मानाचं स्थान आहे. जनतेच्या हक्कांसाठी लढा उभारलेल्या जगातल्या सर्व महान व्यक्तींच्या यादीमध्ये महात्मा गांधींचं नाव घेतलं जातं. पण हेच महात्मा गांधी ‘वर्णद्वेष्टे’ असल्याची टीका करत त्यांचा मुख्य चौकात असलेला पुतळा हटवण्यात आला आहे. त्यावर आ कृतीचं समर्थन देखील करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार एका मोठ्या महाविद्यालयामध्ये घडला आहे. त्यामुळे या घटनेमुळे जगभरात चर्चा सुरू झाली आहे. तुम्ही म्हणाल की हे एवढं सगळं नक्की झालंय कुठे? तर हा सगळा प्रकार घडलाय आफ्रिकेतल्या घाना देशाची राजधानी असलेल्या आक्रामध्ये!

प्रणब मुखर्जींनी केलं होतं अनावरण

२०१६मध्ये भारताचे तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी आक्रामधल्या विद्यापीठात या पुतळ्याचं अनावरण केलं होतं. मात्र, तेव्हापासूनच तिथल्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी या पुतळ्याला विरोध केला होता. एवढंच काय, तर तिथल्या प्राध्यापकांनी महात्मा गांधी वर्णद्वेषी होते असा दावा करत या पुतळ्याविरोधात एक याचिका दाखल केली होती. ‘आधी आफ्रिकेतल्या नेत्यांचे पुतळे उभारायला हवेत’ अशी मागणी देखील त्यांनी याचिकेमध्ये केली होती. यावेळी घाना सरकारकडून पुतळा ‘नवीन जागेवर उभारण्यात येईल’, असं आश्वासन दिलं होतं, असं बीबीसीने दिलेल्या वृत्तामध्ये नमूद करण्यात आलं आहे.

- Advertisement -

पुतळा हटवल्यानंतर केला आनंद साजरा

दरम्यान, या आश्वासनानंतर देखील प्रशासनाकडून कार्यवाही न झाल्यामुळे पुतळ्याला विरोध करणाऱ्या आंदोलकांनी बुधवारी पुतळा हटवला. विद्यापीठाच्या मुख्य चौकातच हा पुतळा उभारण्यात आला होता. पुतळा हटवल्यानंतर तिथल्या विद्यार्थ्यांनी त्याचा आनंद देखील साजरा केला.


हेही वाचा – ‘युएई’त उभारणार महात्मा गांधींचे संग्रहालय

गांधीजी भारतीयांना श्रेष्ठ समजत?

दरम्यान, ‘हा पुतळा इथे असणं याचा अर्थ आम्ही गांधीजींच्या मतांशी सहमत आहोत, असा होतो’ असा दावा तिथल्या विद्यार्थ्यांनी केला. म्हणूनच, पुतळा हटवण्यात आल्याचं देखील त्यांनी सांगितलं. गांधीजींनी अनेक ठिकाणी आफ्रिकन लोकांना आक्षेपार्ह शब्दांमध्ये उल्लेख केला असल्याचा त्यांचा दावा आहे. तसेच, गांधीजी भारतीयांना आफ्रिकन लोकांपेक्षा श्रेष्ठ समजत होते असं देखील त्यांचं म्हणणं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -