घरदेश-विदेशतुमच्या 'आधार'ला करा अधिक सुरक्षित; असं करा Masked Aadhaar डाऊनलोड

तुमच्या ‘आधार’ला करा अधिक सुरक्षित; असं करा Masked Aadhaar डाऊनलोड

Subscribe

सर्व भारतीयांसाठी आधार कार्ड हे महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. म्हणूनच, यूआयडीएआय अर्थात यूनिक आईडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने लोकांसाठी अशी सुविधा दिली होती, ज्यामुळे आधार कार्ड अधिक सुरक्षित होणार आहे. यूआयडीएआयने Masked Aadhaar ची सेवा दिली होती. या नवीन आधारमुळे आधार कार्डच्या 16 अंकांपैकी 12 अंक लपवले जातात आणि त्या आधारमध्ये केवळ तुम्हाला शेवटचे 4 अंक केवळ दिसू शकतात. जाणून घ्या नेमकं काय आहे Masked Aadhaar आणि ते कसं डाऊनलोड करतात वाचा सविस्तर…

Masked Aadhaar म्हणजे?

जेव्हा तुम्ही तुमचं ई-आधार ऑनलाईन डाउनलोड कराल, तेव्हा तुम्हाला दोन प्रकारचे पर्याय दिले जातील. पहिला पर्याय रेग्युलर आधारचा असेल तर दुसरा ऑप्शन Masked Aadhaar असा दिसेल. या दोघांमधील फरक एवढाच आहे की Masked Aadhaar मध्ये 16 अंकांपैकी फक्त शेवटचे 4 अंक दिसतात. त्यामुळे तुमच्या आधारकार्डचा पूर्ण नंबर न दिसता काही ठराविक अंक दिसत असल्याने ते अधिक सुरक्षित होते.

- Advertisement -

असं करा तुमचं Masked Aadhaar डाऊनलोड

  • Masked Aadhaar डाऊनलोड करण्यासाठी https://eaadhaar.uidai.gov.in वर नमूद केलेल्या या दोनपैकी कोणत्याही एका वेबसाइटला भेट द्या
  • तेथे आणखी काही तपशील तुम्हाला विचारले जातील. तुम्हाला प्रथम तुमचा नोंदणी क्रमांक / व्हर्च्युअल आयडी / आधार क्रमांक विचारला जाईल. यापैकी तुम्ही काहीही येथे नोंद करू शकता.
  • त्यानंतर तुम्हाला कोणता ई-आधार हवं आहे हे विचारले जाईल. जर तुम्हाला Masked Aadhaar हवं असेल तर तुम्हाला मास्कड वर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर तेथे तुम्हाला कॅप्चा कोड भरून ओटीपीवर क्लिक करावे लागेल
  • यानंतर ज्या फोन नंबरवर तुमचं आधार लिंक असेल त्या फोनवर एक ओटीपी येईल. तुम्हाला तो ओटीपी तेथे भरावा लागेल.
  • यानंतर तुम्हाला तुमचं Masked Aadhaar डाऊनलोड करण्याचा पर्याय दिसेल आणि तुम्ही ते डाऊनलोड करू शकतात.

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -