घरट्रेंडिंगएका छोट्याशा चुकीमुळे 'ते' बनले करोडपती !

एका छोट्याशा चुकीमुळे ‘ते’ बनले करोडपती !

Subscribe

टायपिंगच्या एका छोट्याशा चुकीमुळे भावदीप सिंग यांचा पगार थेट १६ कोटी रुपये झाला. सिंग यांचा पगार अचानक चार पटीने वाढला.

‘एखादी छोटीशी तुम्हाला खूप महागात पडू शकते’ किंवा ‘छोटीशा चुकीमुळे तुमचं आयुष्य उध्वस्त होऊ शकतं’, असं आपण अनेकदा ऐकतो. मात्र, नकळत झालेली एखादी चूक तुमच्या पथ्यावर पडली तर? त्या चुकीमुळे तुम्ही रातोरात धनवान बनलात तर? काहीसं असचं घडलंय फोर्टिस हेल्थकेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी भावदीप सिंग यांच्यासोबत. टायपिंगच्या एका चुकीमुळे सिंग यांचा पवार चार पटींनी वाढला. सिंग यांच्या मुळ पगारात एकूण १३ कोटी रुपयांचा निवड झाली. एकीकडे फोर्टिस हेल्थकेअर कंपनीचं आर्थिक गणित कोलमडलं असताना कंपनीच्या सीईओंच्या पगारात अचानक इतकी वाढ झाल्यामुळे हे प्रकरण उजेडात आलं.

काय होती चूक?

भावदीप सिंग यांची जून २०१५ मध्ये ३ कोटी ९१ लाख पगारावर कंपनीमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना ७ कोटी २३ लाख रुपये बोनसही देण्यात आला होता. मात्र कंपनीच्या वार्षिक अहवालातील चित्र काहीतरी वेगळेच होते. कंपनीच्या वार्षिक ऑडिटमध्ये सिंग यांचा पगार १६ कोटी ८० लाख दाखवण्यात आला होता. साल २०१५-२०१६ आणि २०१६-१७ या आर्थिक वर्षांत कंपनीच्या वार्षिक अहवालात सिंग यांच्या पगारात चार पटीने वाढ दाखवण्यात आल्याचा खुलासा मिंटने प्रकाशित केला. तर दुसरीकडे २०१५-१६ आणि २०१६-१७ या दोन वर्षांत कंपनीचं अनुक्रमे ७३ कोटी आणि ७४ कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अहवाल सादर करण्यात आला होता. याचा अधिक तपास केला असता प्रत्यक्षात सिंग यांची पगारवाढ झाली नसून टायपिंग एररमुळे त्यांच्या पगाराच्या आकड्यात वाढ दिसल्याची बाब समोर आली.

- Advertisement -

फोर्टिस हेल्थकेअरच्या प्रवक्त्यांनी म्हटल्यानुसार, ‘२०१६-१७ च्या आहवालात सिंग यांच्या पगाराचा आकडा टाईप करताना चूक झाली. त्यामुळे त्यांच्या पागारात चौपट वाढ झाल्याचं दिसून आलं.’ प्रत्यक्षात मात्र गेल्या दोन वर्षांत सिंग यांच्या पगारात केवळ ६ ते ८ टक्केच वाढ करण्यात अाली असल्याचं, संबंधित प्रवक्त्यांनी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -