घरदेश-विदेशWest Bengal Election 2021: अरेरे! ममता दीदी स्वतःलाच म्हणाल्या '...मी गाढव आहे'

West Bengal Election 2021: अरेरे! ममता दीदी स्वतःलाच म्हणाल्या ‘…मी गाढव आहे’

Subscribe

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी कोणाचंही नाव न घेता ‘प्रभावशाली’ अधिकारी कुटुंबाचा ‘खरा चेहरा’ ओळखू न शकल्यामुळे स्वत:ला मूर्ख अर्थात गाढव असे म्हटले आहे. बॅनर्जी म्हणाले, ‘मी म्हणते की मी एक अत्यंत मूर्ख व्यक्ती आहे, ज्यांना मी ओळखू शकले नाही.’ पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील अधिकारी कुटुंबाविरूद्ध संताप व्यक्त करताना त्यांनी एका निवडणूक सभेत म्हटले की, ‘त्यांनी (अधिकार परिवार) मोठं साम्राज्य निर्माण केल्याची अफवा मीसुद्धा ऐकली आहे.

आगामी निवडणुकीत नंदीग्राम विधानसभा मतदार संघातून ममता बॅनर्जी आणि शुभेंदू अधिकारी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये शुभेंदू तृणमूल कॉंग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. जिल्ह्यात राजकीय वर्चस्व असलेल्या अधिकारी कुटुंबातील बहुतेक सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यांनी भाजपामध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाच्या अन्य वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत शुभेंदू अधिकारी यांचे वडील आणि तृणमूल कॉंग्रेसचे खासदार शिशिर अधिकारी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला.

- Advertisement -

ममता बॅनर्जी एका प्रचार सभेत म्हणाल्या की, ‘मी म्हणते की मी खूप मूर्ख (गाढव) आहे आणि मी त्यांना ओळखू शकली नाही. मला माहित नाही, परंतु लोक म्हणतात की, त्यांनी एक प्रचंड साम्राज्य तयार केले असून ते ५ हजार करोडचे आहे आणि ते मतं खरेदी करण्यासाठी पैशांचा वापर करतील, परंतु अशा लोकांना मतदान करू नका. ममता दीदी असेही म्हणाल्या की, सत्तेत आल्यानंतर मी याची कसून चौकशी करेल. त्यांनी अधिकारी कुटुंबाची तुलना ‘मीर जाफर’ म्हणजेच देशद्रोही यांच्याशी केली. ते म्हणाले की, मतदार संघातील लोकं हे सहन करणार नाहीत तर ते आपल्या मतांनी त्याचे उत्तर देतील.

दरम्यान, या प्रचारसभेत ममता बॅनर्जी यांनी भाजपावर देखील निशाणा साधला. ममता बॅनर्जी म्हणाल्या की भाजपा म्हणजे भारतीय जोगोनो पार्टी. बंगालीमध्ये अतिशय वाईट गोष्टीस जोगोनो असे म्हटले जात. ममता दीदी म्हणाल्या की, मी सात वेळा खासदार झाले आहे आणि अनेक पंतप्रधानांना पाहिले आहे. पण इतका कठोर आणि निर्दय पंतप्रधान मी कधीच पाहिला नाही. भाजपा राक्षस, दानव, रावण, दुर्योधन, दुशासन, अस्वस्थ आणि अतिरेकी लोकांचा पक्ष आहे.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -