घरताज्या घडामोडीरस्त्याच्या कडेला लघुशंका करणे पडले महाग, चोरटा BMW घेऊन पसार

रस्त्याच्या कडेला लघुशंका करणे पडले महाग, चोरटा BMW घेऊन पसार

Subscribe

उत्तर प्रदेशमधील नोएडा य़ेथे रस्त्याच्या कडेला बीएमडब्ल्यू गाडी पार्क करून लघुशंका करणे एका तरुणाला चांगलच महागात पडलं आहे. कारण याच संधीचा गैरफायदा घेत चोरट्याने तरुणाची महागडी बीएमडब्ल्यूच पळवून नेली. ऋषभ अरोरा असे कारमालक तरुणाचे नाव आहे.

ऋषभ शनिवारी  पार्टीहून रात्री उशीरा घरी येण्यास निघाला होता. त्याने मद्यसेवनही केले होते. पण वाटेत लघुशंका आल्याने तो थांबला . त्यानंतर रस्त्याच्या कडेला कार पार्क करून तो लघुशंका करण्यास आडोशाला गेला. त्याचवेळी त्याला काहीजण कार सुरू करत असल्याचा आवाज आला. त्याने वळून बघताच त्याच्या पायाखालची जमिनच सरकली. कारण चोरट्यांचे एक टोळके बीएमडब्लू घेऊन तरुणाच्या डोळ्यासमोरून पळून गेले. विशेष म्हणजे ही कार ऋषभच्या बहिणीची होती. त्याचे ४० लाखाचे कर्ज ही अजून भरायचे आहे. असे ऋषभने पोलिसांना सांगितले. दरम्यान कारचोरीची ही घटना योजना आखूनच केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.  गेल्या आठवड्याभरापासून ऋषभ बहिणीची बीएमडब्लू वापरत होता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -