घरताज्या घडामोडीSupreme court : सुप्रीम कोर्टाबाहेर एका व्यक्तीचा आत्मदहनाचा प्रयत्न, प्रकृती गंभीर

Supreme court : सुप्रीम कोर्टाबाहेर एका व्यक्तीचा आत्मदहनाचा प्रयत्न, प्रकृती गंभीर

Subscribe

राजभर मागील काही दिवसांपूसन निराश होता यामुळे त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु परिवाराकडून याबाबत अधिकृत मत व्यक्त करण्यात आले नाही.

सर्वोच्च न्यायालयासमोर शुक्रवारी एका व्यक्तिने आत्मदहनाचा प्रयत्न केला. स्वतःवर केरोसीन टाकून आग लावली यामुळे तरुण गंभीर भाजला आहे. वेळीच आग विझवण्यात आल्यामुळे तरुणाला वाचवण्यात यश आले आहे. जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तरुणाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव राजभव गुप्ता आहे.

सर्वोच्च न्यायालयासमोर एका तरुणाने स्वतःवर केरोसीन टाकून आत्मदन करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तरुण गंभीर भाजला आहे. उपस्थित सुरक्षा रक्षकांनी वेळीच धाव घेतल्यामुळे अनर्थ टळला आहे. तरुण गंभीर असून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणारा तरुण नोएडामध्ये राहणारा आहे. या तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न का केला याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या १ नंबर गेटजवळ राजभर पोहोचला आणि त्याने स्वतःवर केरोसीन टाकून पेटवून घेतले. यानंतर तिथे उपस्थित सुरक्षा रक्षक आणि लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. व्यक्तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या तरुणाची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

राजभरने जसे स्वतःला पेटवून घेतले त्यानंतर घटनास्थळी लोकांची धावपळ झाली. आगीच्या भडका उडाला असल्यामुळे सुरुवातीला लोक बचाव करण्यास पुढे जाण्यासाठी घाबरत होते. गेटवर उपस्थित कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु आग विझवण्यात आली तेव्हा तरुण मोठ्या प्रमाणात भाजला गेला होता. यामुळे तरुणाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

- Advertisement -

पोलिलासंनी राजभरच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आहे. आत्महत्येमागील कारण जाणून घेण्यासाठी पोलीस राजभरच्या कुटुंबीयांची चौकशी करत आहेत. राजभर मागील काही दिवसांपूसन निराश होता यामुळे त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु परिवाराकडून याबाबत अधिकृत मत व्यक्त करण्यात आले नाही.


हेही वाचा : अमर जवान ज्योतीचे १९७१ युद्धाशी कनेक्शन काय? कुठे स्थलांतरित करणार मशाल? जाणून घ्या

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -