घरदेश-विदेशमीडिया टायकून रुपर्ट मरडॉक 92 व्या वर्षी करणार पाचवे लग्न, 'ही' आहे...

मीडिया टायकून रुपर्ट मरडॉक 92 व्या वर्षी करणार पाचवे लग्न, ‘ही’ आहे नववधू

Subscribe

नवी दिल्ली : मीडिया टायकून रुपर्ट मर्डोक वयाच्या 92 व्या वर्षी पाचव्यांदा लग्न बंधणात अडकणार आहेत. 66 वर्षीय अॅन लेस्ली स्मिथसोबत रुपर्ट लग्न करणार आहेत, तर लेस्ली स्मिथचेही हे तिसरे लग्न आहे. रुपर्ट मर्डोक गेल्या वर्षी चौथ्या पत्नीपासून विभक्त झाले होता. रुपर्ट मर्डोक आणि अॅन लेस्ली यांची गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात कॅलिफोर्नियामध्ये भेट झाली होती. हे दोघेही उन्हाळ्यात लग्न करणार असल्याची शक्यता आहे.

रुपर्ट यांनी न्यूयॉर्क पोस्टला सांगितले की, ‘मला प्रेमात पडण्याची भीती वाटत होती, परंतु मला माहित होते की हे माझे शेवटचे प्रेम असेल आणि मी आनंदी आहे. न्यूयॉर्क पोस्ट हे रुपर्ट यांच्या स्वतःच्या मीडिया चॅनेलपैकी एक आहे. रुपर्ट यांनी खुलासा केला की, त्यांनी सेंट पॅट्रिक डेच्या दिवशी स्मिथला प्रपोज केले होते, तर अॅन लेस्ली स्मिथ यांनी सांगितले की, मी १४ वर्षांपासून विधवा आहे आणि रुपर्ट प्रमाणेच माझा नवरा चेस्टर स्मिथ हा व्यापारी होता.

- Advertisement -

रुपर्ट यांना ६ मुले
रुपर्ट यांना त्याच्या पहिल्या तीन पत्नींपासून सहा मुले आहेत. गेल्या वर्षी त्यांनी चौथ्या पत्नीला घटस्फोट दिला होता. 2016 मध्ये, वयाच्या 85 व्या वर्षी रुपर्ट यांनी 65 वर्षीय मॉडेल जेरी हॉलशी लग्न केले होते. हे लग्न फक्त 6 वर्षे टिकले आणि 2022 मध्ये दोघे विभक्त झाले.

रूपर्ट मर्डोक यांच्या लग्नाविषयी
1. रुपर्ट मर्डोक यांचे पहिले लग्न 1956 मध्ये पॅट्रिशिया बुकशी झाले होते. हे लग्न 1967 पर्यंतच टिकले.
2. दुसरे लग्न 1967 मध्ये अण्णा मारिया टोर्व्हशी झाले आणि ते 1999 पर्यंत टिकले.
3. 1999 मध्ये वेंडी डेंगशी तिसरे केले आणि 2013 मध्ये ते विभक्त झाले.
4. 2016 मध्ये मॉडेल जेरी हॉलशी लग्न केले आणि 2022 मध्ये दोघे विभक्त झाले.

- Advertisement -

रूपर्ट मर्डोक यांच्याविषयी…
रुपर्ट मर्डोक यांचा जन्म 1931 मध्ये ऑस्ट्रेलियात झाला, पण सध्या ते अमेरिकेचे नागरिक आहेत. 1952 मध्ये रुपर्ट ऑस्ट्रेलिया न्यूज लिमिटेडचे ​​एमडी बनले. ही कंपनी त्यांना त्यांच्या वडिलांकडून वारशाने मिळालेली आहे. यानंतर त्यांनी 50 आणि 60 च्या दशकात मीडिया व्यवसायाचा इतर देशात झपाट्याने विस्तार केला. रुपर्ट यांच्याकडे सध्या अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनमधील प्रमुख वृत्तपत्रे आणि चॅनेल आहेत.
रुपर्ट हे प्रसिद्ध द टाइम्स, संडे टाइम्स, द सन यासह ब्रिटनमधील अनेक वृत्तपत्रांचे मालक आहेत. यूएसमध्ये ते वॉल स्ट्रीट जर्नल, न्यूयॉर्क पोस्ट, डाऊ जोन्स स्थानिक मीडिया ग्रुप, 7 न्यूज इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस, फॉक्स टीव्ही ग्रुप आणि स्काय इटालियाचे मालक आहेत.
रुपर्ट यांची ट्वेंटीफर्स्ट सेंच्युरी फॉक्स ही चित्रपट आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील एक प्रसिद्ध कंपनी आहे. तसेच स्टार स्पोर्ट्स, नॅशनल जिओग्राफिक आणि ब्रिटिश स्काय ब्रॉडकास्टरमध्येही त्यांची हिस्सेदारी आहे.
2000 सालापर्यंत रुपर्ट यांच्या न्यूजकॉर्पमध्ये तब्बल 800 कंपन्यांचा समावेश होता आणि 50 देशांमध्ये त्यांचे व्यवसाय होते. फोर्ब्सने सर्वात श्रीमंत अमेरिकन 2013 च्या यादीत रुपर्ट यांना 33 व्या क्रमांकावर ठेवले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -