Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई एक लाख गुढ्या उभारुन हिंदू नववर्षाचे स्वागत करणार- ॲड. आशिष शेलार

एक लाख गुढ्या उभारुन हिंदू नववर्षाचे स्वागत करणार- ॲड. आशिष शेलार

Subscribe

गेल्या काही दिवसात उध्दव ठाकरे यांचा पक्ष आणि आघाडीतील पक्ष एका विशिष्ट समाजाच्या मतांसाठी लांगुलचालन करीत मुंबईत हिरवे वादळ आणू पाहतंय. त्याला उत्तर म्हणून ही हिंदूत्वाची गुढी भाजपा उभारत आहे, असा टोलाही आमदार अॅड. आशिष शेलार यांनी लगावला.

हिंदूच्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला गुढीपाडवा भाजपा मुंबईच्या वतीने दणक्यात साजरा करण्यात येणार असून मुंबईत भाजपाचे कार्यकर्ते एक लाख गुढ्या उभारुन हिंदू नववर्षाचे स्वागत करणार आहेत, अशी माहिती भाजपा मुंबई अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी दिली.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुंबईत होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी आज भाजपा आमदार अॅड.आशिष शेलार यांनी प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, आता हिंदू सण मोठ्या उत्साहाने महाराष्ट्रात साजरे केले जात आहेत. हिंदू सणांमध्ये नागरिकांचा मोठा उत्साह सर्वत्र पाहायला मिळतो आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर भाजपातर्फे दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्र,‍ दिवाळी, शिवजयंती आदी सण उत्सव जल्लोषात साजरे करण्यात आले. नुकतेच ‘जाणता राजा’ महानाट्याच्या सादरीकरणालाही मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. सुमारे १ लाख नाट्य रसिकांनी हे महानाट्य पाहिले.

- Advertisement -

त्यानंतर आता नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध भागांत भाजपा नेते, बूथ प्रमुख, कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने शोभायात्रा काढण्यात येणार असून त्यासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या मिरवणुका देखील आयोजित करण्यात येणार आहेत. लालबाग, परळ, वरळी विलेपार्ले, बोरिवली, दहिसर या भागात या शोभायात्रा काढण्यात येणार आहेत.

तर भाजपाचे ९८०० बुथवर प्रत्येकी बुथवर ११ कार्यकर्ते आपल्या घरी गुढी उभारणार आहेत. अयोध्येत प्रभू रामाचे भव्य मंदिर साकारण्यात येत असून तेही काम प्रगतीपथावर आहे. स्वप्नपूर्तीचा क्षण हा जवळ येत आहेच त्याचा ही आनंद या निमित्ताने साजरा केला जाणार आहे.

- Advertisement -

भाजपा देशातील सर्वांत मोठा सेवाकार्य करणारा पक्ष आहे. हिंदू संस्कृतीचा समृध्द वारसा पुढे नेला जात आहे. गुढी म्हणजे विजय पताका असून प्रत्येक हिंदू बांधवांनी गुढीपाडवा मोठ्या उत्साहाने साजरा करत खऱ्या अर्थाने हिंदुत्वाची गुढी उभारावी, असे आवाहन भाजपा नेते आ. ॲड. आशिष शेलार यांनी केले.

हे तर हिरव्या वादळाला उत्तर
गेल्या काही दिवसात उध्दव ठाकरे यांचा पक्ष आणि आघाडीतील पक्ष एका विशिष्ट समाजाच्या मतांसाठी लांगुलचालन करीत मुंबईत हिरवे वादळ आणू पाहतंय. त्याला उत्तर म्हणून ही हिंदूत्वाची गुढी भाजपा उभारत आहे, असा टोलाही आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी लगावला.

- Advertisment -