घरमनोरंजनबहुप्रतिक्षित सिरीज ‘डायनेस्टिज’चा दुसरा सीझन लवकरच होणार प्रदर्शित

बहुप्रतिक्षित सिरीज ‘डायनेस्टिज’चा दुसरा सीझन लवकरच होणार प्रदर्शित

Subscribe

लोकप्रिय वन्‍यजीव सिरीज ‘डायनेस्टिज’ला भव्‍य यश मिळाल्‍यानंतर थीम ‘लेगसी मस्‍ट लिव्‍ह ऑन’सह शोचा दुसरा सीझन घेऊन येत आहे. लक्षवेधक कथानकासह ‘डायनेस्टिज २’ पहिल्‍या सीझनपेक्षा साहसी दर्जाला नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍याची खात्री देतो. या शोचा काही करिष्‍माई प्राणी प्रजातींच्‍या सिक्रेट जीवनांबाबत नवीन माहिती देण्‍याचा मनसुबा आहे, जेथे ते त्‍यांच्‍या कुटुंबियांसाठी विषम परिस्थितीविरोधात लढतात. सर डेव्हिड अ‍ॅटनबरो यांनी कथन केलेले हे भव्‍य व्हिज्‍युअल आहे, जे कुटुंब शक्‍ती आहे हा संदेश देते.

सहा भागांची सिरीज विविध प्राणी राजवंशांच्या गुंतागूंतीचा शोध घेते, त्यांच्या गुंतागूंतीच्या सामाजिक संरचना, वर्तणूक आणि त्यांचे अस्तित्व परिभाषित करणाऱ्या नातेसंबंधांना सादर करते. ‘डायनेस्टीज २’मध्ये हत्ती व चित्ता असलेल्या आयकॉनिक फेवरेट्स आश्चर्यकारक, नाट्यमय आणि हृदयस्पर्शी कथा आहेत, तसेच प्राणी साम्राज्य, प्युमा आणि हायना यांच्या काही अनसंग हिरोंच्‍या कथा देखील आहेत. जगभरात चित्रित केलेली सिरीज ‘डायनेस्टिज २’ प्रेक्षकांना पॅटागोनियाच्या गोठलेल्या अँडीज आणि झांबियाच्या प्रदेशांपासून माऊंट किलीमांजारोच्या सावलीत पसरलेल्या गवताळ प्रदेशापर्यंत व्हिज्युअल टूरवर घेऊन जाते.

- Advertisement -

‘डायनेस्टिज २’च्‍या प्रीमियरबाबत चर्चेला चालना देण्‍यासाठी चॅनेलने भारतीय ए-कॅपेला बॅण्‍ड सोबत सहयोग केला आहे, ज्याने लेगसी लिव्हिंग ऑन बाबत गाणे तयार केले आहे. हे गाणे सिरीजचा भाग असलेल्या सर्व प्रसिद्ध प्राण्यांच्या आवाजाच्या ए-कॅपेलाद्वारे समर्थित आहे आणि पूर्णपणे वाद्यांचा वापर न करता तयार केले आहे. तसेच, चॅनेल मुंबई (नेहरू सायन्स सेंटर), दिल्ली (इंडिया हॅबिटॅट सेंटर) आणि चेन्नई (दक्षिणा चित्र) या प्रमुख महानगरांमध्ये शोच्या विनातिकीट एक्‍सक्‍लुसिव्‍ह स्क्रिनिंगद्वारे सहभाग वाढवत आहे.


हेही वाचा :

‘हॅप्पी फॅमिली: कंडीशंस अप्लाय’ सिरीज अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -