घरक्राइम'मिग २१' लढाऊ विमानाचे टायर गेले चोरीला ; स्कॉर्पिओपिओतील चोरट्यांचा तपास सुरु

‘मिग २१’ लढाऊ विमानाचे टायर गेले चोरीला ; स्कॉर्पिओपिओतील चोरट्यांचा तपास सुरु

Subscribe

आशियाना पोलीस शहीद पथावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा तपास सुरु आहे.

लखनौ – बीकेटीच्या एअरफोर्स स्थानकावरुन एका लढाऊ विमानाचे टायर चोरीला गेल्याची खळबळजनक घटना घडली आहे.स्कॉर्पियोतून आलेल्या दोन चोरांनी रस्सीच्या साहाय्याने बीकेटी एअरबेसमधून लढाऊ विमानाचे चाक चोरले.याप्रकरणी लढाऊ विमानाच्या चालकाने आशियान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आशियाना पोलीस शहीद पथावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा तपास सुरु आहे.

बक्षी का तालाब येथील मिग-२१ स्क्वाडनच्या लढाऊ विमानांचे पाच टायर जोधपूर एअर फोर्स स्टेशनला पाठवण्यात येत होते. २७ नोव्हेंबरला दुपारी २ वाजताच्या सुमारास जोधपूर एअर फोर्स स्टेशनला जोडलेला ट्रेलर आरजे ०१ जीए-३३३८ हा ट्रेलर घेऊन चालक हेमसिंग रावत  जात होते. हा ट्रेलर शहीद पथ मार्गाकडून कानपूरकडे जात होता. याच दरम्यान, एसआर हॉटेलजवळ वाहतूक कोंडी झाली आणि ट्रेलर तिथेच थांबवला. यावेळेस ट्रेलरच्या पाठीमागील स्कॉर्पिओमधील संधीसाधू चोर ट्रेलरमध्ये चढले आणि हत्यारांचा वापर करत चोरट्यांनी रस्सीने बांधलेले लढाऊ विमानाचे टायर सोडले.आपल्याकडील धारदार हत्याराचा वापर करुन त्यांनी रस्सीने बांधलेले लढाऊ विमानाचे टायर सोडले. ट्रेलर चालक हेमसिंग रावत यांना सुगावा लागण्याअगोदरच या दोन चोरट्यांनी एक टायर स्कॉर्पिओ गाडीमध्ये टाकले.

- Advertisement -

हेमसिंग यांना काही समजण्यापूर्वीच चोरट्यांनी टायर काढून स्कॉर्पिओमधून पळ काढला. हेमसिंग यांनी घटनास्थळी ११२ क्रमांकावर पोलिसांना घटनेची माहिती दिली.काळ्या रंगाची स्कॉर्पिओ शोधण्यासाठी शहीद पथापासून आजूबाजूच्या सर्व रस्त्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन करण्यात येत असल्याचे आशियानाचे निरीक्षक धीरज शुक्ला यांनी सांगितले.पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर ट्रेलर उर्वरीत टायर घेऊन जोधपूरकडे रवाना झाला. तेथे वायूसेना पोलिसांकडून हेमसिंह रावत यांची चौकशी करण्यात आली.


हे ही वाचा – Katrina Kaif Vicky Kaushal Wedding : कतरिना- विक्की कौशल लग्नाचे फोटो मॅग्जीनला करोडो रुपयांचा विकणार?

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -