घरताज्या घडामोडीकोरोना लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर पंतप्रधान मोदींचा फोटो का आहे?, केंद्राने दिले स्पष्टीकरण

कोरोना लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर पंतप्रधान मोदींचा फोटो का आहे?, केंद्राने दिले स्पष्टीकरण

Subscribe

कोरोना लस (Corona Vaccine) घेतल्यानंतर मिळणाऱ्या लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर (Vaccine Certificate) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो दिसतो. याच फोटोची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. तसेच विरोधकांना या फोटोवरून केंद्र सरकावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. परंतु आता राज्यसभेत (Rajya Sabha) आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर पंतप्रधान मोदींचा फोटो असल्याचे काय कारण आहे? हे सांगितले आहे.

आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी राज्यसभेत सांगितले की, ‘कोरोनाला रोखण्यासाठी कोरोना नियमांचे पालन करणे हा सर्वात प्रभावी उपाय आहे. कोरोना लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो आणि त्यासोबत संदेश छापल्यामुळे जनजागृती करण्यास मदत होते. लसीकरण झाल्यानंतरही कोरोनाचे नियम पाळावेत, हे लोकहिताच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. हाच संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर मोदींचा फोटो छापण्यात आला आहे.’

- Advertisement -

पुढे भारती पवार म्हणाल्या की, ‘कोविन अॅपच्यामाध्यमातून जे लसीकरणाचे सर्टिफिकेट दिले जात आहे, ते मानक आहे आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमांनुसार आहे. कोरोना संदर्भात लोकांपर्यंत जास्तीत जास्त महत्त्वाचे संदेश परिणामकारक पद्धतीने पोहचावेत ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे.’

देशात आतापर्यंत ५१ कोटी ८१ लाख ५२ हजारांहून अधिक लोकांचे लसीकरण झाले आहे. यापैकी ४० कोटींहून अधिक जणांना पहिला डोस दिला असून ११ कोटींहून अधिक जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ISROचे EOS-03 सॅटेलाईट लॉचिंग काउंटडाउन सुरू, पूर आणि चक्रीवादळाचे करणार ट्रॅकिंग


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -