घरक्रीडाजगभरात मीराबाईच्या नावाचा डंका पण अजूनही पाय जमिनीवरचं,मीराबाईच्या साधेपणानं जिंकली मनं

जगभरात मीराबाईच्या नावाचा डंका पण अजूनही पाय जमिनीवरचं,मीराबाईच्या साधेपणानं जिंकली मनं

Subscribe

मीराबाई चानूने अविस्मरणीय कामगीरी केली आहे.

भारतासाठी टोकियो ऑलिम्पिकची दमदार सुरुवात झाली असून स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी मीराबाई चानूने अविस्मरणीय कामगीरी केली आहे. भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिकच्या ४९ किलो वजनी गटात रौप्यपदकाची पटकावले आहे. यानंतर मीराबाईवर सर्व स्तरावरून कौतूकाचा वर्षाव करण्यात आला. इतकंच नाही तर क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी मीराबाईचे जंगी स्वागत करुन तिचा स्तकार केला. सध्या सोशल मीडियावर मीराबाईचा एका फोटोची जोरदार चर्चा होत आहे. या फोटोमधून मीराबाईचं साधेपणाचे चित्रण सहजरीत्या झळकत आहे. आज जगभरात मीराबाईचं नाव गाजत असलं तरी मीराबाईने साधेपणा जपत पुढे वाटचाल करताना दिसत आहे. मीराबाईचा ऑलिम्पिक मेडल पटकवण्याचा प्रवास म्हणावा तितका सोप्पा नव्हता. खडतर परिश्रम करत राज्य,राष्ट्रीय पातळीवर उत्तम कामगिरी बजावत मीराबाईने टोकियो ऑलिम्पिकच्या स्पर्धेत दाखल झाली. ऐकेकाळी लहानपणी आपल्या भावंडा बरोबर मिळून लाकडे घेऊन येणारी मीराबाईच्या कौशल्याला तिच्या आईने अचूक घेरले. आपल्या मुलीला वेटलिफ्टर बनवायचे अशी तिची इच्छा होती.

mirabai chanu her home manipur after winning silver medal tokyo olympics
जगभरात मीराबाईच्या नावाचा डंका पण अजूनही पाय जमिनीवरचं,मीराबाईच्या साधेपणानं जिंकली मनं

2016 मधील रिओ ऑलिम्पिकमध्ये तीन प्रयत्नानंतर देखील मीराबाई वजन उचलण्यात अपयशी ठरली. तिच्या पाठीला दुखण्याचा त्रास होऊ लागला तसेच तिला सराव करणेही अश्यक झाले. पण केंद्र सरकारने 71 लाख रुपये खर्च करत तिला सरावासाठी अमेरीकेत पाठवले आणि मीराबाईने आपले कतृत्व सिद्ध करत यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी बजावत मीराबाईने रौप्यपदक जिंकले.

- Advertisement -

हे हि वाचा – Tokyo Olympics : तिरंदाज दीपिका कुमारीच्या पदकाच्या आशा कायम!

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -