उपस्थितीबरोबरच शब्द जपून वापरा, पंतप्रधानांच्या नव्या खासदारांना सूचना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेच्या नवनिर्वाचित 27 सदस्यांशी शपथविधीनंतर संवाद साधला. यावेळी वशब्द जपून वापरावेत, असा सल्ला खासदारांना दिला.

prime minister narendra modi praised vice president venkaiah naidu in parliment

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेच्या नवनिर्वाचित 27 सदस्यांशी शपथविधीनंतर संवाद साधला. यावेळी वरिष्ठ सभागृहात नियमित हजर राहावे, सभागृहात तयारी करून यावे आणि शब्द जपून वापरावेत, अशा सूचना त्यांनी खासदारांना दिल्या. यावेळी नीर्मला सीतारामन, पीयुष गोयल हे सुद्धा राज्यसभेत निवड झाल्याने नवनिर्वाचित खासदारांमध्ये होते.

8 जुलैला (शुक्रवारी) उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभेच्या 27 खासदारांचा शपथ दिली. यावेळी भाजपचे पीयुष गोयल, नीर्मला सीतारामन, सुरेंद्र सिंगल नागर, के लक्ष्मण, लक्ष्मीकांत वाजपेयी आणि कल्पना सैनी या नेत्यांनी शपथ घेतली. या शपथ विधीनंतर मोदींनी खासदारांना मार्गदर्शन केले. सभागृहात नियमित उपस्थित रहावे आणि शब्दांचा वापर  जपून करावा, अशी सूचना मोदींनी खासदरांना दिल्या.

महाराष्ट्रातील या खासदारांनी घेतली शपथ –

8 जुलैला (शुक्रवारी) महाराष्ट्रातील पीयुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांनी शपथ घेतली. महाडिक आणि बोंडे यांनी मराठीतून शपथ घेतली. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगढी उपस्थित नव्हते