घरदेश-विदेशशपथविधी होताच मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

शपथविधी होताच मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा दुसरा शपथविधी गुरुवारी संपन्न झाला. त्यानंतर आज (शुक्रवार, ३१ मे) मोदी कॅबिनेटची पहिली बैठक पार पडली. या बैठकीत मोदी सरकारने मागच्या अर्थसंकल्पात केलेल्या एका आश्वसनाची पुर्तता केली आहे. असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या ६० वर्षांवरील व्यक्तीला दरमहा ३ हजार पेंशन (निवृत्तीवेतन) देण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे. कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी या फाईलवर आज स्वाक्षरी केली. फेब्रुवारी महिन्यात अर्थमंत्री पियूष गोयल यांनी हंगामी अर्थसंकल्प सादर करताना फेरीवाले, रिक्षाचालक, बांधकाम शेतमजूर, बीडी कामगार यांच्यासह इतर क्षेत्रातील असंघटीत कामगारांना या योजनेचा लाभ घेता येईल.

योजना काय आहे –

– ज्या कामगारांचे मासिक उत्पन्न १५ हजारांपर्यंत आहे, अशा कामगारांना या योजनेचा लाभ घेता येईल.

- Advertisement -

– या योजनेचे नाव ‘प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना’ असे आहे.

– या योजनेचा लाभ १० कोटी कामगारांना होणार आहे.

- Advertisement -

– १८ ते २९ वय असणाऱ्या कामगारांना या योजनेत मासिक योगदान ५५ रुपये द्यावे लागेल. (६० वय असेपर्यंत)

– तर २९ च्या पुढे वय असणाऱ्या कामगाराचे मासिक योगदान १०० रुपये असणार आहे. (६० वय असेपर्यंत)

– केंद्र सरकार आणि संबंधित कामगार यांचे या योजनेत मासिक योगदान समसमान असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -