घरताज्या घडामोडीजेव्हा मतं मागायची वेळ येते तेव्हा.., भारत जोडो यात्रेत मेधा पाटकरांच्या सहभागावर...

जेव्हा मतं मागायची वेळ येते तेव्हा.., भारत जोडो यात्रेत मेधा पाटकरांच्या सहभागावर मोदींची टीका

Subscribe

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत जोडो यात्रेच्या दरम्यान नर्मदा बचाव आंदोलनच्या कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी सहभाग घेतला होता. तेव्हा त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत पदयात्रा केली होती. त्यामुळे गुजरातमध्ये धोराजीमधील एका सभेला संबोधित करताना मोदींनी राहुल गांधी आणि मेधा पाटकर यांच्यावर टीका केली.

काँग्रेसचे नेते एका अशा महिलेसोबत पदयात्रा करत आहेत. ज्यांच्यामुळे तीन दशकांपासून नर्मदा धरण प्रकल्प रखडला होता. जेव्हा काँग्रेसचे नेते मतं मागायला आले तेव्हा त्यांना विचारा की, जे लोकं नर्मदा धरणाच्या विरोधात होते. तेव्हा त्यांच्या खांद्यावर हात ठेवून तुम्ही पदयात्रा काढता, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

- Advertisement -

यापूर्वी देखील गुजरातचे विद्यमान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही गुजरात निवडणुकीदरम्यान मेधा पाटकर यांच्यावर निशाणा साधला होता. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी भारत जोडो यात्रेत मेधा पाटकर यांच्या पदयात्रेवर आक्षेप घेत ट्वीट केले आहे. काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी सतत गुजरात आणि गुजराती लोकांच्याबद्दल वैप दाखवले आहे. मेधा पाटकरांना यात्रेत मध्यवर्ती स्थान देऊन आपण त्या घटकांच्या पाठीशी उभे असल्याचे दाखवून दिले आहे. ज्यांनी अनेक दशकांपासून गुजराती लोकांना वंचित ठेवलं आहे. ते गुजरात सहन करणार नाही.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले की, अनेक संकटांचा सामना करून हे धरण बांधले आणि त्यामुळेच आज गुजरातच्या दूरवरच्या भागात पाणी पोहोचत आहे. गुजरातमध्ये १ आणि ५ डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार असून हिमाचल प्रदेशसह ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. गुजरातमधील विधानसभेच्या एकूण १८२ जागांपैकी ८९ जागांसाठी १ डिसेंबरला आणि उर्वरित ९३ जागांसाठी ५ डिसेंबरला मतदान होणार आहे.


हेही वाचा : NDA प्रवेश परीक्षेत औरंगाबादची अनुष्का अनिल बोर्डे द्वितीय


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -