घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरNDA प्रवेश परीक्षेत औरंगाबादची अनुष्का अनिल बोर्डे द्वितीय

NDA प्रवेश परीक्षेत औरंगाबादची अनुष्का अनिल बोर्डे द्वितीय

Subscribe

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) शुक्रवारी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) आणि नौदल अकादमी परीक्षा (I) 2022 चा निकाल जाहीर केला. रुबिन सिंग यंदा एनडीए परीक्षेत टॉपर ठरला आहे. त्याचबरोबर टॉप 3 मध्ये दोन मुलींचा समावेश आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) शुक्रवारी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) आणि नौदल अकादमी परीक्षा (I) 2022 चा निकाल जाहीर केला. रुबिन सिंग यंदा एनडीए परीक्षेत टॉपर ठरला आहे. त्याचबरोबर टॉप 3 मध्ये दोन मुलींचा समावेश आहे. त्यानुसार औरंगाबादची अनुष्का अनिल बोर्डे हिला द्वितीय आणि वैष्णवी गोरडे हिला तृतीय क्रमांक मिळाला. या वर्षी एकूण ५१९ उमेदवारांनी एनडीएची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. या परीक्षेत बसलेले उमेदवारांना upsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर आपला निकाल पाहता येणार आहे. (Aurangabad Girl Anushka Borde Gets All India Rank 2 In Common Merit List For Nda)

यंदा १० एप्रिल रोजी उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर, सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाद्वारे (SSB) मुलाखत घेण्यात आली. त्याआधारे अंतिम निकाल तयार करण्यात आला आहे. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना पुढील १५ दिवस अधिकृत वेबसाइटवर निकाल तपासता येईल असे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

या परीक्षेत औरंगाबादेतील अनुष्का अनिल बोर्डे हिने देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. अनुष्काच्या या यशाबद्दल मेजर जनरल (डॉ.) यशमोरे यांनी तिचे अभिनंदन केले आहे. ट्विट करत त्यांनी अनुष्काचे अभिनंजन केले आहे. “अनुष्का बोर्डेला एनडीएच्या कॉमन मेरिट लिस्टमध्ये संपूर्ण भारतात दुसरा क्रमांक मिळाला आहे. लहान शहरातील मुलीसाठी हे खरोखरच मोठे यश आहे. त्यांच्या कुटुंबात संरक्षण पार्श्वभूमीचे कोणीही नाही. सामाजिक जबाबदारीचा भाग म्हणून त्यांना मार्गदर्शन करताना मला आनंद होत आहे”, अशा शब्दांत त्यांनी अभिनंदन केले.

मेजर जनरल (डॉ.) यश मोर यांच्या मर्गदर्शनाखाली अनुष्काने यशाचं हे शिखर गाठलं. मेजर जनरल (डॉ.) यश मोर यांनी जवळपास चार दशकं देशाची सेवा केली. त्यानंतर निवृत्तीनंतर त्यांनी यश मोर अकादमी (YMA)ची स्थापना केली. ज्याचा उद्देश देशातील त्या तरुण-तरुणींना योग्य मार्गदर्शन देण्याचा होता जे लष्करात सामील होऊ इच्छितात पण त्यासाठी ते मोठ मोठ्या ठिकाणी महागड्या शिकवण्या लावू शकत नाहीत. त्यामुळे यश मोर सरांनी अशा तरुण-तरुणींसाठी कमी शुल्कात कोचिंग उपलब्ध करुन दिली. मुलींच्या पहिल्या बॅचमधील १२ पैकी ३ मुलींनी ही परीक्षा उत्तीर्ण केली. तर, सध्याच्या बॅचच्या चार मुलींनी या परीक्षेत बाजी मारली, ज्यात अनुष्काचाही समावेश आहे.

- Advertisement -

दरम्यान, यंदाही एनडीएच्या परीक्षेत मुलींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. गेल्या वर्षी एका ऐतिहासिक निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने मुलींना यूपीएससी एनडीए परीक्षेत बसण्याची परवानगी दिली होती. एनडीए परीक्षेत मुलींना संधी द्यावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून होत होती. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणीनंतर न्यायालयाकडून मुलींना परीक्षेसाठी परवानगी देण्यात आली होती. परवानगी मिळाल्यानंतर गेल्या वर्षीही मोठ्या संख्येने मुलींनी एनडीए परीक्षेसाठी अर्ज केले होते. यंदा एनडीए परीक्षेत बसणाऱ्या मुलींची संख्याही वाढली आहे. त्याचा थेट परिणाम निकालावरही दिसून आला आहे.


हेही वाचा – मुंबईत सीटबेल्टचा वापर बंधनकारक; मुदत संपताच पोलिसांकडून कारवाईला सुरुवात

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -