घरदेश-विदेशमोदी सरकारने चीनला रोखण्यासाठी लडाखमध्ये खिळे ठोकायला हवे होते - ओवैसी

मोदी सरकारने चीनला रोखण्यासाठी लडाखमध्ये खिळे ठोकायला हवे होते – ओवैसी

Subscribe

गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ शेतकरी लादलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत आहे. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिसांचारामुळे दिल्लीतील राजमार्ग बॅरिगेट्स लावून खिळे ठोकून रस्ते बंद करण्यात आले. यावरुन पंतप्रधान मोदींवर अनेकांकडून टिकाही करण्यात आली. ‘विरोधक शेतकऱ्यांना अडवण्यासाठी दिल्लीचा राजमार्ग खोदले,बॅरिगेट्स आणि खिळे ठोकण्यात आले. अशी पावलं मोदी सरकारने लडाख येथे चीनच्या आक्रमक सैन्याला रोखण्यासाठी करायला पाहिजे होते’, असे एआईएमआईएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे. ‘मोदी सरकराने शेतकऱ्यांच्या ‘मन की बात’ ऐकावी’, असे म्हणत ओवैसी यांनी मोदी सरकरावर सडकून टिका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या केंद्र सरकरावर ओवैसी यांनी हल्लाबोल केला.

‘जर तुम्ही लडाखमध्ये अशाप्रकारचे खिळे ठोकले असते तर चीनी सैन्यांनी भारतात खुसखोरी केली नसती परंतु तुम्ही तसे केले नाही. त्यामुळे भारतीय सैन्यातील १८ जवान शहिद झाले. तुमची छाती जर ५६ इंचांची असती तर तुम्ही आतापर्यंत चीनला धडा शिकवला असता’, असे ओवैसी अहमदाबादच्या एका रॅलीमध्ये म्हणाले. त्याचप्रमाणे ‘मोदींनी आतापर्यंत चीनचे नावही घेतलेले नाही. ते सर्व लोकांची आणि सर्व गोष्टींची नावे घेतील मात्र चीनचे नाव कधी घेणार नाहीत’,असेही ते म्हणाले.

- Advertisement -

केंद्र सरकारने देशीतील शेतकऱ्यांसाठी तयार केलेले कृषी कायदे हे संविधानाच्या विरोधात आहे, असा आरोप ओवैसी यांनी केला आहे. शेती हा राज्याचा विषय आहे. त्यामुळे केंद्राला राज्या संदर्भात कोणतेही कायदे करण्याचा अधिकार नाही ,असेही ते म्हणाले. शेतकरी त्यांच्या हक्कासाठी लढत आहेत.गेली २ महिने कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करत आहेत. कृषी कायद्यांना विरोध केला म्हणून त्यांना खलिस्तानी म्हटले जात आहे. तर आदिवासी दलितांना नक्षलवादी आणि मुस्लिमांना जिहादी म्हटले जात आहे.


हेही वाचापाकमध्ये गेलेले १०० काश्मिरी तरुण बेपत्ता

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -