घरदेश-विदेशकेरळमध्ये मान्सून दाखल; येत्या २४ तासांत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

केरळमध्ये मान्सून दाखल; येत्या २४ तासांत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

Subscribe

पुढील ५ दिवस कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असं हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे.

यंदा मान्सून ठरलेल्या वेळेपूर्वीच केरळमध्ये दाखल झाला आहे. मान्सून आणि हवामानविषयक माहिती देणाऱ्या स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार (Skymet) दक्षिण पश्चिम मान्सून यावर्षी ३० मे रोजीच केरळमध्ये दाखल झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मान्सून ८ दिवस आधीच केरळमध्ये पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात मान्सून १ जूनपर्यंत पोहोचेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र मान्सून १ जूनपूर्वीच दाखल झाला. 2 ते 4 जून दरम्यान मुंबई व उपनगरामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, पावसाने आज मुंबईत हजेरी लावली.

भारतीय हवामान विभागानं जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकानुसार, अरबी समुद्र आणि लक्षद्वीपच्या दक्षिण आणि मध्यपूर्व भागात रविवार सकाळपासून कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. ३१ मेच्या दुपारपर्यंत अशीच परिस्थिती होती. पुढचे २४ तास अरबी समुद्राच्या दक्षिण आणि मध्यपूर्व भागात ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढच्या २४ तासांत वादळी वारे वाहण्याची शक्यता आहेत.

- Advertisement -

दरम्यान, हे मोसमी वारे प्रतिताशी ४५ ते ५५ किमी वेगानं वाहत असून अरबी समुद्राच्या आग्नेय आणि मध्य-पूर्व भागात पोहोचेपर्यंत ते प्रतिताशी ६५ किमी वेगानं वाहायला लागतील. हे वारे ते पुढच्या २४ तासांत केरळच्या समुद्रपट्टीवर धडकण्याची चिन्हं आहेत. २ जूनच्या सकाळी कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावर पोहेचेपर्यंत वाऱ्याचा वेग प्रतिताशी ६५-७५ किमीहून ८५ पर्यंत पोहोचणार आहे. तर ३ जूनच्या सकाळी हे वारे महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर प्रतिताशी ९०-१०० किमीहून ११० वेगानं वाहतील.


हेही वाचा – गेल्या ६ वर्षात आरोग्य क्षेत्रासाठी मोठे निर्णय घेतले – पंतप्रधान नरेंद्र मोदी

- Advertisement -

या राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पुढील ५ दिवस कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने लोकांना किनाऱ्यावर जाऊ नका असा इशारा दिला आहे. याव्यतिरिक्त लक्षद्वीप, केरळ, किनारी कर्नाटक, आसाम, पश्चिम बंगाल, सिक्किम, छत्तीसगड, ओडिशा आणि महाराष्ट्रातील काही भागात येत्या २४ तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -