घरदेश-विदेशट्रॅफिक नियमांचं उल्लंघन करणं पडेल महागात!

ट्रॅफिक नियमांचं उल्लंघन करणं पडेल महागात!

Subscribe

नव्या नियमांमुळे नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

उत्तर प्रदेशात ट्रॅफिकच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे नागरिकांना महागात पडणार आहे. रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चांगलाच फटका बसणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने ट्रॅफिक नियमांत बदल केला आहे. ट्रॅफिकच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला आता ५ पट अधिक दंड भरावा लागणार आहे. यूपी सरकारने नागरिकांसाठी याची अधिसूचनाही जारी केली होती. आजपासूनच हे नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.

नियमांतील बदल

  • हेल्मेट किंवा सीट बेल्टचा वापर न करणाऱ्या चालकाला याआधी दंड म्हणून १०० रुपये द्यावे लागत होते. परंतु नव्या नियमानुसार, वाहनचालकाला ५०० रुपये दंड द्यावा लागणार आहे.
  • नियमापेक्षा जास्त वेगाने जाणाऱ्या व्यक्तीला २००० रुपये दंड भरावा लागेल. याआधी १००० रुपये भरावे लागत होते.
  • वाहन चालवताना फोनवर बोलणाऱ्या चालकाला ५०० रुपये मोजावे लागणार आहे.
  • चुकीच्या दिशेने वाहन चालवणाऱ्याला ५०० रुपयांच्या जागेवर १००० रुपये दंड भरावा लागेल.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -