राज ठाकरेंनी स्वप्नात रामाचे दर्शन करावे, प्रत्यक्षात … – बृजभूषण सिंह

MP Brij Bhushan Singh has opposed Raj Thackeray's visit to Ayodhya
MP Brij Bhushan Singh has opposed Raj Thackeray's visit to Ayodhya

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध दर्शवला आहे. जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतातील लोकांची माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना अयोध्येत उतरू देणार नसल्याचे बृजभूषण सींह यांनी सांगीतले. आज त्यांनी अयोध्येत शक्ती प्रदर्शनकरत रॅली काढली असून राज ठाकरेंच्या विरोधासाठी संतांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला रणनिती ठरवण्यासाठी 50 हजार लोक जमणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी राज ठाकरे माफी मांगो’, ‘राज ठाकरे चूहा है’ अशा घोषणा देण्यात आल्या.

जोपर्यंत राज ठाकरे माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना उत्तरप्रदेक्ष, झारखंड, बिहार कोठेही ते येऊ शकनार नाहीत. कोणा कधी पाप केले असेल तर ते भोगावे लागते असे आम्ही मानतो. पूर्व जन्मात केलेले पाप सुद्धा भोगावे लागते. आज ती व्यक्ती माझी चूक झाली हे दोन शब्द बोलायला तयार नाही. त्यामुळे राज ठाकरेंनी स्वप्नात रामाचे दर्शन करावे प्रत्यक्षात ते झारखंड, बीहार, उत्तरप्रदेशातील कोणत्याही जिल्ह्यात पाय ठेवू शकत नाहीत. आमचे प्रत्येक राज्यात बोलन सुरू आहे. पुढे पहा काय होतय ते, असे खासदार बृजभूषण सींह म्हणाले.

काय आहे प्रकरण –

2008 साली राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांविरोधात राज्यात आंदोलन केले होते. यावेळी उत्तर प्रदेशातून येणाऱ्या लोंढ्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचे नुकसान होत असल्याच्या आशयाची टीका राज ठाकरेंनी केली होती. यावरून राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला खासदार बृज भूषणसींह यांनी विरोध केला आहे. यावेळी त्यांनी राज ठाकरेंनी माफी मागितलीच पाहिजे, अशी मागणी केली आहे.