देशात कोरोनाचा वेग मंदावला, चौथ्या लाटेची शक्यता धूसर

देशात कोरोनाच्या चौथ्या लाटेची दाट शक्यता जाणवत असताना आता एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. देशातील दररोज वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची मोठ्याप्रमाणात घट झाली असून मृत्यूंची संख्या सुद्धा कमी झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाच्या नव्या 2 हजार 288 रूग्णांची नोंद झाली असून 10 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.आधीच्या दिवसांच्या तुलनेत गेल्या 24 तासात 919 रूग्णांची घट झाली आहे. 24 तासांपूर्वी कोरेनाबाधितांची नोंद 3207 अशी असून 29 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनारूग्णांच्या संख्येत घसरण

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार देशातील कोरोना रूग्ण बरे होण्याचा दर 98.74 टक्के आहे. तर आतापर्यंत देशात एकुण 4 कोटी 25 लाख 63 हजार 949 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच आतापर्यंत कोरोना संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या 4 कोटी 31 लाख 7 हजार 637 झाली आहे. गेल्या 24 तासामध्ये 10 कोरोनामृत्यूसह कोरोनामुळे झालेल्या रूग्णांच्या मृत्यूंची संख्या 5 लाख 24 हजार 103 वर पोहोचली आहे. सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 19 हजार 637 इतकी झाली आहे.

ठाण्यात सापडले नवे रूग्ण
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 16 नवीन रूग्णांची भर पडली आहे. ठाण्यात आत्तापर्यंत कोरोना झालेल्या रूग्णांची संख्या 7 लाख 9 हजार 224 वर पोहोचली आहे.

12-14 वयोगटातील ३ कोटींपेक्षा जास्त मुलांनी घेतला डोस
देशभरात 12-14 वयोगटातील 3 कोटींपेक्षा जास्त मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी दिली.

 


हेही वाचा :मोहालीतील पंजाब पोलिसांच्या गुप्तचर कार्यालयाबाहेर मोठा स्फोट