घरदेश-विदेश३६ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात राज बब्बर यांना २ वर्षांची शिक्षा

३६ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात राज बब्बर यांना २ वर्षांची शिक्षा

Subscribe

राज बब्बर यांनी 80 च्या दशकाच्या उत्तरार्धात चित्रपट जगतातून राजकारणात प्रवेश केला, 1989 मध्ये ते व्हीपी सिंह यांच्या नेतृत्वाखाली जनता दलात सामील झाले

बॉलिवूड अभिनेते आणि काँग्रेस नेते राज बब्बर यांना लखनौच्या एमएलए कोर्टाने दोन वर्षांचा तुरुंगवास आणि ८५०० रुपयांची दंडाची शिक्षा सुनावली आहे. मतदानावेळी बूथमध्ये घुसून गोंधळ घालणे आणि पोलिंग एजंटशी गैरवर्तन केल्याबद्दल त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. ३६ वर्षे जुने हे प्रकरण आहे.

सध्या राज बब्बर हे काँग्रेसचे नेते आहेत. तसेच उत्तर प्रदेश काँग्रेस पक्षाचे ते प्रदेशाध्यक्षही राहिले होते. दरम्यान आज कोर्टातील सुनावणीवेळी राज बब्बर न्यायालयात हजर होते. यावेळी कोर्टाने दोन वर्षांचा तुरुंगवास आणि ८५०० रुपयांची दंडाची शिक्षा सुनावली आहे. मात्र कोर्टाच्या निर्णयाविरोधात ते उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.

- Advertisement -

हे प्रकरण १९९६ सालचे आहे. राज बब्बर यांनी त्यांच्या समर्थकांसह मतदानाच्या ठिकाणी प्रवेश केला आणि मतदान प्रक्रियेवर परिणाम केला इतकेच नाही तर सरकारी कामात अडथळा आणला आणि कर्तव्यावर असलेल्या लोकांशी गैरवर्तन करत त्यांना मारहाण केली. यावेळी श्रीकृष्ण सिंह राणा यांच्यासह पोलिंग एजंट शिव सिंह जखमी झाले.

यावेळी २ मे १९९६ रोजी मतदान अधिकारी कृष्ण सिंह राणा यांनी वजीरगंज पोलिस ठाण्यात समाजवादी पक्षाचे उमेदवार राज बब्बर, अरविंद यादव यांच्यासह अनेक लोकांविरुद्ध तक्रार दाखल केली होती.

- Advertisement -

या प्रकरणाच्या तपासानंतर २३ मार्च १९९६ रोजी राज बब्बर आणि अरविंद यादव यांच्याविरुद्ध कलम १४३, ३३२, ३५३, ३२३, ५०४, १८८ आयपीसी आणि लोकप्रतिनिधी कायदा आणि ७ फौजदारी कलमांखाली आरोपपत्र दाखल करण्यात आले. याच प्रकरणात लखनौ एमएलए कोर्टाने गुरुवारी निकाल दिला. मात्र यानंतर त्यांना कोर्टाने जामीन मंजूर केला.

राज बब्बर यांनी 80 च्या दशकाच्या उत्तरार्धात चित्रपट जगतातून राजकारणात प्रवेश केला, 1989 मध्ये ते व्हीपी सिंह यांच्या नेतृत्वाखाली जनता दलात सामील झाले. यानंतर ते समाजवादी पक्षात गेले आणि तीन वेळा लोकसभेचे खासदार राहिले. 2004 मध्ये ते लोकसभेचे खासदार झाले.

2006 मध्ये मुलायमसिंह यादव यांच्याशी त्यांचे संबंध बिघडले. त्यांनी समाजवादी पक्ष सोडला. 2008 मध्ये राज बब्बर काँग्रेसमध्ये दाखल झाले आणि 2009 मध्ये फिरोजाबादमधून त्यांनी अखिलेश यादव यांना सर्वात मोठा धक्का दिला. त्यांनी अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांचा पराभव केला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर राज बब्बर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.


‘काली’ पोस्टर वादामध्ये आता सीएम ममतांची उडी; म्हणाल्या, भावना समजून…

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -