घरदेश-विदेशजन्मदात्या पित्यानेच केली मुलीची हत्या; उंदरांनी कुडतरला घरात ठेवलेला मृतदेह

जन्मदात्या पित्यानेच केली मुलीची हत्या; उंदरांनी कुडतरला घरात ठेवलेला मृतदेह

Subscribe

ऑस्ट्रेलियातील ब्रिसबेन शहरात एका निर्दयी बापानेच आपल्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्या मुलीचा मृतदेह घरामध्ये छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. तिच्या चेहऱ्याला उंदरांनी कुडतरून टाकले होते. या हत्येच्या घटनेची माहिती मिळताच शहरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली असून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. डेली मेल या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मार्क जेम्स डन यांनी पोलिसांना सांगितले की, शनिवारी सकाळी त्यांनी त्यांच्या ४ वर्षीय मुलीला मृतावस्थेत पाहिले. मात्र असे असतानाही त्यांनी डॉक्टरांना संपर्क केला नाही. तसेच कोणतीही अत्यावश्यक मदत मागितली नाही. यामुळे जेम्स यांच्यावरील संशय अजून बळावला.

हेही वाचा – ट्विटरने काढली ट्रम्प यांची चूक; ट्रम्प यांनी दिली ट्विटरला धमकी

- Advertisement -

काय आहे प्रकरण 

धक्कादायक बाब म्हणजे मुलीला मारून टाकल्यानंतर आरोपीने तिचा मृतदेहदेखील घरातच ठेवून दिला. हा मृतदेह ठेवल्याने तो सडून जाईल याचीही काळजी त्या नराधमाने केली नाही. दरम्यान, चार वर्षाच्या चिमुकलीच्या मृतदेहाला उंदरांनी कुडतरून टाकले. तिचा चेहरा ओळखेनासा झाला. या प्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहेत. बापाने स्वतःच्याच मुलीला का मारले हे अद्याप समजू शकले नाही. पोलीस याबाबत चौकशी करत आहेत. जेम्सवर बालहत्येचा आणि गुन्हा लपवण्याच्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. स्वतःच्याच मुलीला निर्घृणपणे मारून तिचा मृतदेह सडण्यासाठी सोडून दिल्याचे कृत्य चीड आणणारे आहे. या घटनेमुळे शहरातही दहशतीचे वातावरण पसरले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -