घरदेश-विदेशट्विटरने काढली ट्रम्प यांची चूक; ट्रम्प यांनी दिली ट्विटरला धमकी

ट्विटरने काढली ट्रम्प यांची चूक; ट्रम्प यांनी दिली ट्विटरला धमकी

Subscribe

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरला लवकरच मोठी कारवाई केली जाईल अशी धमकी दिली आहे.

मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटवर फॅक्ट चेकचा लेबल लावला आहे. हा फॅक्ट चेकचा लेबल ट्रम्प यांनी केलेलं ट्विट चूक आहे हे सांगण्यासाठी आहे. ट्विटरच्या या निर्णयानंतर डोनाल्ड ट्रम्प आता ट्विटरवर बोलण्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणतंय आणि राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचा आरोप करत आहेत. इतकेच नव्हे तर नविन ट्विट करत त्यांनी लवकरच मोठी कारवाई केली जाईल अशी धमकी दिली आहे.

नविन ट्विटमध्ये ट्रम्प म्हणाले आहेत की, “ट्विटरने आता दाखवून दिले आहे की आम्ही जे बोलत होतो ते बरोबर आहे. मोठी कारवाई केली जाईल”. ट्रम्प यांच्या ट्विटनंतर ट्विटरने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. कशाप्रकारे कारवाई करणार आहेत हे अद्याप स्पष्ट नाही. परंतु त्यांनी असंही म्हटलं आहे की सोशल मीडिया सेवा एकतर नियमित केली जावी किंवा बंद करावी.

- Advertisement -

हेही वाचा – भारत-चीन सीमावादात मध्यस्थी करण्यास अमेरिका तयार – ट्रम्प


 

- Advertisement -

ट्विटरच्या फॅक्ट चेक टॅगिंगबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटलं आहे की या मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइटचा परिणाम अमेरिकन निवडणुकीवर होत असून बोलण्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणत आहे. यापूर्वी केलेल्या ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की, “ट्विटर आता २०२० च्या अध्यक्षीय निवडणुकीत हस्तक्षेप करत आहे. ते असं म्हणत आहेत की मतपत्रिका- मेलबद्दल दिलेलं माझं विधान चुकीचं आहे. या सत्याची पडताळणी फेक न्यूज सीएनएन आणि अ‍ॅमेझॉनच्या वॉशिंग्टन पोस्टने केली आहे.”

डोनाल्ड ट्रम्प यांनीही म्हटलं आहे की, “ट्विटर बोलण्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणत आहे आणि मी अध्यक्ष म्हणून परवानगी देणार नाही.”

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -