घरताज्या घडामोडीनारायण राणे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सदिच्छा भेट

नारायण राणे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सदिच्छा भेट

Subscribe

नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच अमित शाह यांची भेट घेतली

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नवे केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सदिच्छा भेट घेतली. नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच अमित शाह यांची भेट घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात फेर बदल करण्यात आले आहेत. मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना प्राधान्य दिलं आहे. नारायण राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन ३ वर्ष झाले असून मोदींना नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी दिली आहे. नारायण राणे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात चांगले मैत्री संबंध आहेत.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. नारायण राणे यांनी ट्विट करत अमित शाह यांची सदिच्छा भेट घेतली असल्याचे सांगितले आहे. राणेंनी सदिच्छा भेट घेतली असलील तरी राज्यातील अनेक विषयांवर चर्चा झाली असल्याची शक्यता आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या कामकाजावर या दोन बड्या नेत्यांची चर्चा झाली असल्याची शक्यता आहे. नारायण राणे हे महाराष्ट्रातील आक्रमक नेते असल्यामुळे कोकणात भाजपचा विस्तार करण्यासाठी नारायण राणे यांचा उपयोग होऊ शकतो यामुळे राणेंना मोठी जबाबदारी दिली असल्याच्या राज्यातील नेत्यांनी म्हटलं आहे. मंत्री नारायण राणे यांनी रोड केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची देखील सदिच्छा भेट घेतली होती.

- Advertisement -

पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे कडक स्वभावाचे आहेत. राणेंनी ८ जुलैला मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला त्यावेळी मंत्रालयातील अधिकारी राणेंचे स्वागत करायला हातात पुष्पगुच्छ घेऊन उभे होते. राणे मंत्रालयात पोहचल्यावर त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आणि राणेंच्या प्रश्नांवरुन अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. मंत्री नारायण राणे यांनी अधिकाऱ्यांना विचारले की, मंत्रालयाचे जीडीपीमध्ये कीती योगदान आहे? दोन वर्षात मंत्रालयाने किती रोजगार उपलब्ध केले? भेटण्यासाठी आल्यानंतर एकाही अधिकाऱ्याच्या हातात फाईल नाही? हा सगळा डेटा कोण सांगणार आहे? असे प्रश्न करुन अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतलं होते.

- Advertisement -

नारायण राणे यांनी मानले आभार

नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा पदभार स्वीकरल्यानंतर सर्व कार्यकर्ते, नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहे. नारायण राणे यांनी ट्विट करत एक प्रसिद्ध पत्रक जारी केलं आहे. यामध्ये राणेंनी भेटले आहे की, भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री पदावर काम करण्याची संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नडड्डा तसेच महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मिळाली. केंद्रीय मंत्री पदावर निवड झाल्यानंतर संपुर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून, सर्व पक्षाचे पदाधिकारी, नेते तसेच भाजप पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते ज्येष्ठ नेत्यांपर्यंत सर्वांनी फोन करुन व अन्य मार्गाने माझे अभिनंदन केले व मला शुभेच्छा दिल्या. काही जणांनी देवाजवळ प्रार्थनाही केल्या. आपल्या या प्रेमाबद्दल मी आपले ऋण व्यक्त करतो. अशा शब्दात नारायण राणे यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -