घरदेश-विदेशममता दीदींनी बंगालवासीयांचा विश्वासघात केला - नरेंद्र मोदी

ममता दीदींनी बंगालवासीयांचा विश्वासघात केला – नरेंद्र मोदी

Subscribe

मी कोब्रा, माझा एक दंशही पुरेसा - मिथुन चक्रवर्ती

विधानसभा निवडणुकीची घोषणा पहिल्यांदाच पश्चिम बंगालच्या दौर्‍यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल केला. बंगालने परिवर्तनासाठीच ममता दीदींवर विश्वास ठेवला. पण, दीदी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विश्वासघात केला. या लोकांनी बंगालचा विश्वास तोडला. या लोकांनी बंगालला अपमानित केले. मुलींवर अत्याचार केले, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली सभा कोलकातातील ब्रिगेड मैदानावर पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेससह डावे पक्ष आणि काँग्रेसवर निशाणा साधला. पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, बंगालमध्ये जन्म घेतलेल्या महान व्यक्तींनी एक भारत, श्रेष्ठ भारत ही भावना बळकट केली. बंगालच्या याच भूमीने एक संविधान, एक निशान, एक पंतप्रधान यासाठी बलिदान देणारा पूत्र दिला. अशा पवित्र भूमीला मी नमन करतो. या भूमीने संस्काराची ऊर्जा दिली. या भूमीने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात प्राण फुंकले. बंगालच्या या भूमीने ज्ञान आणि विज्ञानाच्या क्षेत्रात भारताची मान उंचावली. त्याच बंगालला ममता बॅनर्जी यांनी धोका दिला, अशी टीका मोदी यांनी केली.

- Advertisement -

बंगालने परिवर्तनासाठी ममता दीदींवर विश्वास टाकला होता. पण, दीदी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बंगालचा विश्वासघात केला. या लोकांनी बंगालला अपमानित केले. इथल्या बहिणी आणि मुलींवर अत्याचार केले. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत एका बाजूला तृणमूल काँग्रेस, डावे आणि काँग्रेस, त्यांना बंगाल विरोधी वागणूक आहे. तर दुसर्‍या बाजूला बंगालची जनता पाय रोवून उभी आहे. ब्रिगेड मैदानावरील जनतेचा आवाज ऐकल्यानंतर कुणालाही शंका राहणार नाही, असेही मोदी म्हणाले.

मी कोब्रा, माझा एक दंशही पुरेसा – मिथुन चक्रवर्ती

अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यासपीठावर भाजपत प्रवेश केला. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला. कुणी जर हक्क हिसकावून घेत असेल, त्याच्या हक्कासाठी उभा राहीन. मी कोब्रा आहे. कुणी जर हिसकावून घेणार असेल तर मी उभा राहीन. मी चावलो, तर तुम्ही फोटोसारखेच होणार. माझा एक दंशही पुरेसा आहे. मी बंगाली आहे आणि जो कुणी इथे वाढला आहे, त्याचा भूमीवर अधिकार आहे. मी ग्वाही देतो की, पश्चिम बंगालमध्ये राहणार्‍या प्रत्येक माणसाच्या हक्कासाठी मी लढेल, असे मिथून चक्रवर्ती म्हणाले.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -