घरदेश-विदेशपाकिस्तानात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर; पुरामुळे हजारो मृत्यूमुखी, कोट्यवधी नागरिक बेघर

पाकिस्तानात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर; पुरामुळे हजारो मृत्यूमुखी, कोट्यवधी नागरिक बेघर

Subscribe

पंतप्रधान शहबाज शरीफ आपल्या नातीच्या उपचारांसाठी ब्रिटनला जात होते. मात्र, देशातील बिघडत जात असलेली परिस्थिती पाहता त्यांनी आपला नियोजित दौरा रद्द करून देशाच्या परिस्थितीवर लक्ष दिलं आहे.

भारताच्या शेजारील राष्ट्र म्हणजेच पाकिस्तानात सध्या तुफान पाऊस आहे. त्यामुळे तिथे पूर आला नसून नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुरामुळे आतापर्यंत एक हजार जणांचा मृत्यू झाल्याचीही माहिती समोर येतेय. दरम्यान, पाकिस्तानात आता राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. तसेच, पूरपरिस्थितीत बाधित झालेल्या पीडितांच्या पुनर्वसनासाठी पाकिस्तान सरकारने आर्थिक मदत मागण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानच्या समा टीवीच्या वृत्तानुसार, पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी ब्रिटनचा दौरा रद्द केला आहे. त्यांनी दौरा रद्द करून नागरिकांच्या पुनर्वसनासाठी बैठक घेतली.

हेही वाचा – जम्मू- काश्मीरमध्ये काढणार स्वत:चा पक्ष; राजीनाम्यानंतर आझाद यांचा मोठा निर्णय

- Advertisement -

देशात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आल्याची घोषणा गुरुवारी पाकिस्तानचे सूचना आणि प्रसारण मंत्री मरियम औरंगजेब यांनी केली. बलुचिस्तान आणि सिंधमध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. पुरामुळे नागरिकांचं जीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळे या दोन्ही शहरांप्रती राष्ट्रीय भावना निर्माण होण्याकरता आणीबाणी जाहीर कऱण्यात आली आहे. या पुरामुळे आतापर्यंत ३४३ मुलांचं आणि ९३७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, तीन कोटी लोक बेघर झाले आहेत.

हेही वाचा – कर्मचाऱ्यांना मिळणार वीजबील भरण्यासाठी १८ हजार रुपये, ‘या’ कंपनीचा निर्णय

- Advertisement -

समा टीवीच्या अहवालानुसार, सरकारने आता निधी मागण्यास सुरुवात केली आहे. पुरामुळे पाकिस्तानात अनेक विदेशी नागरिकही अडकून पडले आहेत. त्यामुळे त्यांच्या पुनर्वसनासाठीही सरकारने निधी मागितला आहे.

पंतप्रधान शहबाज शरीफ आपल्या नातीच्या उपचारांसाठी ब्रिटनला जात होते. मात्र, देशातील बिघडत जात असलेली परिस्थिती पाहता त्यांनी आपला नियोजित दौरा रद्द करून देशाच्या परिस्थितीवर लक्ष दिलं आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -