घरताज्या घडामोडीपरदेशी दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींना ईडीचे समन्स, चौकशीला हजर राहणार का?

परदेशी दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींना ईडीचे समन्स, चौकशीला हजर राहणार का?

Subscribe

नॅशनल हेराल्डप्रकरणी (National Herald) राहुल गांधींना ईडीने समन्स बजावले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ईडीने (ED) नव्याने समन्स बजावले आहेत. नॅशनल हेराल्डप्रकरणी (National Herald) हे समन्स बजावण्यात आले असून १३ -१४ जून रोजी त्यांना ईडी (Enforcement Directorate) कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. दरम्यान, राहुल गांधी (Rahul Gandhi) परदेश दौऱ्यावर असून ते ५ जून रोजी भारतात परतणार आहेत. तर, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे.

नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनाही ईडीची नोटीस पाठण्यात आली आहे. त्यांना आठ जून रोजी ईडी (Enforcement Directorate) कार्यालयात चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. दरम्यान, त्यांना कोरोनची लागण झाल्याने त्या चौकशीसाठी जातील की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

- Advertisement -

राहुल गांधी १९ मे रोजी परदेशी दौऱ्यावर रवाना झाले. २० ते २३ मे दरम्यान त्यांनी लंडन येथील आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यानंतर ते अद्यापही भारतात परतले नाहीत. ते ५ जून रोजी भारतात परततील असं सांगण्यात येत आहे.

नेमकं प्रकरण काय?

- Advertisement -

नॅशनल हेराल्ड (National Herald) हे वृत्तपत्र असोसिएट जर्नल्स लिमिटेड (Associate Journals Limited- AJL) अंतर्गत १९३८ पासून काढण्यात येत होते. या कंपनीवर ९० कोटींहून अधिक कर्ज होते. हे कर्ज फेडण्यासाठी २०१० साली यंग इंडिया या कंपनीची स्थापना करण्यात आली. या यंग इंडिया कंपनीत राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची ३८-३८ टक्के भागीदारी होती, तर एजेएलचे ९ टक्के शेअर्स यंग इंडियाला देण्यात आले होते. या कंपनीच्या माध्यमातून एजेएलवरील ९० कोटींचे कर्ज फेडण्यात येईल असं सांगण्यात आलं. मात्र, जास्त मालकीमुळे एजेअलची मालकी यंग इंडियाला मिळाली. कालांतराने ९० कोटींचे कर्जही माफ करण्यात आले. दरम्यान, गांधी कुटुंब हेराल्डच्या मालमत्तांचा बेकायदा वापर करत असल्याचा आरोप सुब्रमण्यम स्वामी यांनी केला. नॅशनल हेराल्डची २ हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केल्याचा आरोप सोनिया आणि राहुल गांधी यांच्यावर करण्यात आला आहे. तेव्हापासून हे प्रकरण प्रलंबित आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -