घरदेश-विदेशनवज्योत सिंग सिद्धू पंजाबचे आगामी उपमुख्यमंत्री?

नवज्योत सिंग सिद्धू पंजाबचे आगामी उपमुख्यमंत्री?

Subscribe

पंजाबमध्ये (Punjab) आगामी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस मैदानात उतरली आहे. काँग्रेसकडून पंजाब विधासभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहे. यातच माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांना २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री पद दिले जाण्याची शक्यता आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain Amarinder Singh) हे आज(बुधवारी) दुपारी भोजनाच्या निमित्ताने नवज्योत सिंग सिद्धू यांनी भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या भेटीत आगामी २०२२ च्या निवडणुकीत (Punjab assembly election 2022) नवज्योत सिद्धू यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या नावावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यापूर्वी नोव्हेंबरमध्ये पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांची भेट घेतली होती. २०१९ मध्ये सिद्धू यांचे स्थानिक पालिका मंत्रालय काढून घेतल्याच्या निर्णयानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्त्वाकडून सिंद्धू यांची नाराजी दूर करत मन वळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे दोन्ही गटांमधील वादविवाद दूर करण्याचा हेतू पंजाबच्या मुख्यमंत्र्यासोबतची ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. यातच काँग्रेस नेते आणि पंजाब प्रभारी हरिश रावत यांनी सिद्धू यांना महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्याच्या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे. यापूर्वी १० मार्चला हरिश रावत यांनीही सिद्धू यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर सकारात्मक चर्चा झाल्याने सिद्धू यांनी सांगितले होते. त्यामुळे काँग्रेस नेतृत्वाकडून आणि काँग्रेस मंत्रीमंडळाकडून सिद्धू यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. सिंद्धू यांचे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह चांगले संबंध आहेत. त्यामुळे आगामी २०२२ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सिद्धू यांच्याकडे स्टार प्रचारक म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे पंजाब निवडणुकीत काँग्रेससाठी सिद्धूचे महत्त्व अधिक असल्याचे दिसत आहे. अशी संदर्भातील वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ या वृत्त पत्राने दिले आहे.

- Advertisement -

हेही वाचा- देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कुटुंब करोडपती, शहरात मुंबईचा क्रमांक पहिला


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -