घरक्रीडानवज्योतसिंग सिद्धू यांना एक वर्षाचा सश्रम कारावास

नवज्योतसिंग सिद्धू यांना एक वर्षाचा सश्रम कारावास

Subscribe

या प्रकरणात सत्र न्यायालयाने सिद्धू यांना 1999 साली निर्दोष सोडले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने 2006 साली सिद्धू यांना तीन वर्षांची शिक्षा आणि एक लाख रुपये दंड केला होता. याविरोधात सिद्धू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाने 34 वर्षे जुन्या मारहाणीच्या प्रकरणात एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यासंबंधी दाखल पुनर्विचार याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी हा निर्णय दिला. सिद्धू यांनी केलेल्या मारहाणीत एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. याआधी सर्वोच्च न्यायालयाने या खटल्यात केवळ एक हजार रुपयांचा दंड आकारून त्यांची सुटका केली होती. कायद्याचा निर्णय आम्ही स्वीकारतो, असे ट्विट सिद्धू यांनी केले आहे. अटकेनंतर त्यांची रवानगी पतियाळा तुरुंगात होण्याची शक्यता आहे.

पतियाळा येथे पार्किंगवरून सिद्धू यांचे गुरनाम सिंग नावाच्या 65 वर्षीय व्यक्तीसोबत 1988 साली भांडण झाले होते. या भांडणाचे रूपांतर हाणामारीत होऊन सिद्धू यांनी गुरनाम सिंग यांना मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या मारहाणीनंतर गुरनाम सिंग यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी नवज्योतसिंग सिद्धू आणि त्यांचा मित्र रुपिंदरसिंग सिद्धू यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला.

- Advertisement -

या प्रकरणात सत्र न्यायालयाने सिद्धू यांना 1999 साली निर्दोष सोडले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने 2006 साली सिद्धू यांना तीन वर्षांची शिक्षा आणि एक लाख रुपये दंड केला होता. याविरोधात सिद्धू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याचा निकाल 16 मे 2018 रोजी लागला. त्यात हत्या करण्याचा सिद्धू यांचा हेतू नसल्याचे नमूद करीत सर्वोच्च न्यायालयाने सिद्धू यांना आरोपातून मुक्त केले होते, मात्र भादंवि कलम 323 नुसार दोषी ठरवण्यात आले होते. याअंतर्गत सिद्धू यांना केवळ एक हजार रुपयांचा दंड करण्यात आला होता. या प्रकरणात दोन वर्षांनंतर मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -