घरताज्या घडामोडीमुस्लिम महिलांच्या फोटोंचा लिलाव करणाऱ्या SULLI DEAL एपविरोधात FIR

मुस्लिम महिलांच्या फोटोंचा लिलाव करणाऱ्या SULLI DEAL एपविरोधात FIR

Subscribe

राष्ट्रीय महिला आयोगाने दिल्ली पोलिस आयुक्तांकडे केली होती पत्र लिहून तक्रार

द नॅशनल कमिशन फॉर वुमन (NCW) ने Github या संकेतस्थळावर Sulli Deals च्या आलेल्या बातम्यांचा आधारीत बातम्यांचा आधार घेत या संपुर्ण प्रकरणाची सुमोटो दखल घेतली आहे. Github या संकेतस्थळाच्या माध्यमातून मुस्लिम महिलांचे फोटो तसेच पत्रकार, कार्यकर्ते, एनेलिस्ट, कलाकार आणि संशोधक यांचाही समावेश हा या संकेतस्थळावर करण्यात आला होता. तसेच खालच्या भाषेत टिप्पणी करत या महिलांना विक्रीसाठी ठेवण्याचा प्रताप या वेबसाईटच्या माध्यमातून दिसून आला.

- Advertisement -

NCW च्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी दिल्ली पोलिस आयुक्तांना पत्र लिहित या संपुर्ण प्रकरणात लक्ष घालण्याची आणि एफआयआर दाखल करण्याची मागणी केली होती. तसेच गुन्हेगाराला कठोर शिक्षा करण्याची मागणीही पत्रात करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोप सुटता कामा नये अशीही मागणी पत्रात करण्यात आली आहे. या संपुर्ण प्रकरणातील अहवाल येत्या १० दिवसांमध्ये दाखल करण्यात यावा अशीही मागणी करण्यात आली आहे. या पत्राची प्रत ही उपायुक्त, सायबर क्राईम युनिटला पाठवण्यात आली आहे. या प्रकरणात NCW मार्फत दिल्ली पोलिसांना तक्रारीचे पत्र मिळाल्यानेच या प्रकरणात FIR दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात GitHub ला दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने नोटीस पाठवली आहे. Sulli Deal या एपच्या माध्यमातून मुस्लिम महिलांचे फोटो चोरून GITHUB या प्लॅटफॉर्मवर लिलावासाठी ठेवण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला होता. या संपुर्ण प्रकरणात दिल्ली पोलिसांनी तत्काळ दखल घेत एफआयआर दाखल केली आहे.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -