NEET PG Exam 2021: नीट पोस्टग्रॅज्यूएट परीक्षेची तारीख जाहीर, ११ सप्टेंबरपासून होणार परीक्षा

केंद्रीय मंत्री मांडवीय यांनी ट्विट करत या नीट पीजी परीक्षेची तारीख जाहीर करत घोषणा केली

neet exam

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी मंगळवारी ट्विट करत नीट पोस्टग्रॅज्यूएट २०२१ परीक्षा येत्या ११ सप्टेंबरपासून सुरु होत आहे. नीट पोस्टग्रॅज्यूएट परीक्षा १८ एप्रिल २०२१ मध्ये होणार होती परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. केंद्रीय मंत्री मांडवीय यांनी ट्विट करत या नीट पीजी परीक्षेची तारीख जाहीर करत घोषणा केली आहे. तसेच विद्यार्थ्यांना या परीक्षेस शुभेच्छाही त्यांनी दिल्या आहेत. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं धुमाकूळ घातलं होत यामुळे एप्रिल महिन्यात कोरोना रुग्णांच्या आकड्यामध्ये वाढ झाली होती. विद्यार्थ्याच्य आरोग्याच्या दृष्टीने या परीक्षा पुढील सूचनेपर्यंत स्थगित केली होती.

नीट पीजी परीक्षा (NEET PG Exam 2021) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असल्यानं परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. विद्यार्थ्याना परीक्षेसाठी तयारी करण्यासाठी १ महिन्याचा वेळ दिला जाणार असल्याची घोषणा यापुर्वी केली होती. याप्रमाणे केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी नीट परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. माजी आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील प्रादुर्भावामुळे परीक्षा पुढे स्थगित केली होती.

केंद्रीय मंत्री मनसूख मांडवीय यांनी ट्विट करत नीट परीक्षेची घोषणा केली आहे. मनसुख मांडवीय यांनी ट्वि केले की, ११ सप्टेंबर २०२१ रोजी नीट पीजी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला गेला आहे. सर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांना माझ्या शुभेच्छा आशा आशयाचे ट्विट मनसुख मांडवीय यांनी केलं आहे.

असं करा परीक्षेसाठी अर्ज

नीट पीजी परीक्षेसाठी एनटीए बुधवारी अर्ज प्रक्रिया सुरु करणार आहे. https://ntaneet.nic.in/Ntaneet या संकेतस्थळावर अधिक माहिती मिळू शकते. तसेच अर्ज प्रक्रिया प्रक्रिया मंगळवारी किंवा बुधवारी संध्याकाळी ५ वाजल्यापासून सुरु करण्यात येणार आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी अर्ज करत असतात.