घरताज्या घडामोडीगेल्या 24 तासांत देशभरात 2,678 नवे कोरोनारुग्ण

गेल्या 24 तासांत देशभरात 2,678 नवे कोरोनारुग्ण

Subscribe

कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस घटत असली तरी, धोका अद्याप टळलेला नाही. देशभरात गेल्या 24 तासांत 2 हजार 678 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. काल देशात 2,786 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे तुलनेनं 108 रुग्णांची घट झाली आहे.

कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस घटत असली तरी, धोका अद्याप टळलेला नाही. देशभरात गेल्या 24 तासांत 2 हजार 678 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. काल देशात 2,786 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे तुलनेनं 108 रुग्णांची घट झाली आहे. एकिकडे रुग्णांची वाढती संख्या आणि दुसरीकडे कोरोनाचे नवा व्हेरिएंट अतिधोकादायक असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (new 2786 corona patients in India)

देशात पुन्हा एकदा दोन हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यासोबतच कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. कोरोनाबाधितांची संख्या आदल्या दिवसाच्या तुलनेत घटली असली, तरी दोन हजारांहून अधिक रुग्ण आढळणे, ही चिंताजनक बाब आहे.

- Advertisement -

याशिवाय, देशातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या 26 हजारांवर गेली आहे. मागील तीन दिवसांत ही संख्या 26 हजारांच्या खाली आलेली नाही. देशात 2,594 रुग्ण गेल्या 24 तासांत कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना सकारात्मक दर 1.08 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रिकव्हरी रेट 1.05 टक्के इतका आहे.

आतापर्यंत देशभरात 4 कोटी 46 लाख 23 हजार 997 रुग्णांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यापैकी 5 लाख 28 हजार 857 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर इतर रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत देशव्यापी कोरोना लसीकरणात 219 कोटीहून अधिक लसी देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा नवा सबव्हेरियंट BF.7 आणि BA.5.1.7 यांमुळे पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. ओमिक्रॉन 2 नवीव सबव्हेरियंट BF.7 आणि BA.5.1.7 आढळून आले आहेत. हे व्हेरियंट चीनमध्ये आढळून आले आहेत. कोरोनाचे नवे सबव्हेरियंट BF.7 आणि BA.5.1.7 ओमिक्रॉनपेक्षा अधिक धोकादायक आणि संसर्गजन्य असल्याचा धोका वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे. चीनमध्ये आढळलेले हे नवीन व्हेरियंट बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स, डेनमार्क आणि इंग्लंड मध्येही पसरताना दिसत आहे.


हेही वाचा – कोरोनाचा नवा BF.7 व्हेरियंट अतिधोकादायक; जाणून घ्या लक्षणं

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -