घरदेश-विदेशना खाऊंगा, ना खाने दूंगा... पंतप्रधान मोदींच्या शेजारी बसलेल्या शिवराजसिंह चौहानांची पंचाईत!

ना खाऊंगा, ना खाने दूंगा… पंतप्रधान मोदींच्या शेजारी बसलेल्या शिवराजसिंह चौहानांची पंचाईत!

Subscribe

उजैन : केंद्रामध्ये सत्तेवर येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी ‘सबका साथ सबका विकास’ या घोषणेबरोबरच ‘ना खाऊंगा और ना खाने दूंगा’ अशी घोषणाही केली होती. तसाच काहीसा अनुभव मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (MP CM Shivraj Singh Chouhan) यांना नुकताच एका कार्यक्रमादरम्यान आला. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावरून नेटिझन्सकडून विविध टिप्पणी केली जात आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी उज्जैनमध्ये ‘महाकाल लोक’चे लोकर्पण केले. याद्वारे महाकालच्या नगरीत पंतप्रधान मोदी यांनी शिवभक्तांना मोठी भेट दिली आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान मंगळवारी दिवसभर उज्जैनमध्येच होते. सकाळपासून त्यांनी चिंतामण गणेश, गढकालका देवी यांचे दर्शन घेतलं. शिप्रावर ओढणी चढवली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यावर ते त्यांच्याबरोबरच होते.

‘महाकाल लोक’चे लोकर्पण सोहळ्यात शिवराजसिंह चौहान हेही व्यासपीठावर पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर उपस्थित होते. त्यांचा एक हात जॅकेटच्या खिशात होता. शेजारी पंतप्रधान मोदी बसले होते. नरेंद्र मोदी यांचे लक्ष नाही, हे पाहताच खिशातून काहीतरी काढून दुसऱ्या हातावर घेतले आणि पटकन तोंडात टाकले. त्याचवेळी सूत्रसंचालन करणाऱ्या महिलेने त्यांना पंतप्रधानांचे स्वागत करण्यास सांगितले. म्हणून नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांच्याकडे पाहिले आणि माईकजवळ जाण्यासाठी खूण केली. पण ते काहीतरी खात असल्याचे पाहून त्यांनी पुन्हा मान फिरवली. या सर्व प्रकारामुळे शिवराजसिंह यांची भंबेरी उडाली.

- Advertisement -

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून त्यावर विविध टिप्पणी सुद्धा केल्या जात आहेत. ‘शिवराज मामांचे हाल तर पाहा… त्यांना शांतपणे खाताही येत नाही. तसे पाहिले तर प्रश्न हा आहे की, मामांनी लपून-छपून खाल्लं तरी काय?’ अशी कमेन्ट एका नेटिझन्सने केली आहे. तर, अन्य एकाने ”मध्य प्रदेश के उज्जैन #महाकाल_लोक में मोदी बैठे थे शिवराज के “बाजू” और मामा दबा कर खा रहे थे “काजू”‘ असे म्हटले आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -