घरताज्या घडामोडीनव्या कृषी कायद्यांचा शेतकऱ्यांना सर्वाधिक फायदा - पंतप्रधान मोदी

नव्या कृषी कायद्यांचा शेतकऱ्यांना सर्वाधिक फायदा – पंतप्रधान मोदी

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी भारतीय वाणिज्य व उद्योग महासंघाच्या (FICCI) ९३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्घाटना वेळी डिजिटल माध्यमातून देशाला संबोधित केले. यावेळी मोदी यांनी कृषी कायद्यांवर भाष्य केले. नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना सर्वाधिक फायदा होणार आहे, असे मोदी म्हणाले. कृषी पायाभूत सुविधा, साठा, कोल्ड साखळी दरम्यानचे अडथळे आता दूर केले जात आहेत. कृषी कायद्यांच्या सुधारणांमुळे शेतकऱ्यांना नवीन पर्याय उपलब्ध होतील आणि त्यांना नवीन तंत्रज्ञानाचा फायदा होईल. त्याचा सर्वाधिक फायदा शेतकऱ्यांना होईल. शेतकर्‍यांना शेती कायद्याद्वारे आपली पिके बाजाराबाहेर विकण्याचा पर्याय उपलब्ध होत आहे. सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे, असे मोदी म्हणाले.

नव्या कृषी कायद्यांनुसार नवीन बाजारपेठ, नवीन पर्याय आणि तंत्रज्ञानाचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. देशातील कोल्ड स्टोरेज, पायाभूत सुविधा आधुनिक असतील. यामुळे कृषी क्षेत्रात अधिक गुंतवणूक होईल. या सर्व गोष्टींचा माझ्या देशातील शेतकऱ्याला सर्वाधिक फायदा होणार आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. मोदींनी यावेळी अर्थव्यवस्थेवरही भाष्य केले. गेल्या काही वर्षांत अर्थव्यवस्थेतीत अडथळे दूर करण्यासाठी काही सुधारणा केल्या आहेत. गेल्या ६ वर्षात भारतानेही असेच एक सरकार पाहिले आहे, जे केवळ आणि केवळ १३० कोटी देशवासीयांना पुढे नेण्याचे काम करीत आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की जीवंत अर्थव्यवस्थेमध्ये जेव्हा एखादे क्षेत्र वाढते तेव्हा त्याचा थेट परिणाम इतर क्षेत्रांवरही होतो. आम्ही करत असलेल्या सुधारणेमुळे अशा सर्व अनावश्यक संरचना काढून टाकल्या जात आहेत. कृषी क्षेत्र असे एक उदाहरण आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -