घरदेश-विदेशनव्या कृषी कायद्यांमुळे शेतकरी बंधनमुक्त

नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकरी बंधनमुक्त

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘मन की बात’

शेतकर्‍यांना नवीन मार्ग मिळाला आहे. बर्‍याच विचारविनिमयानंतर भारताच्या संसदेने कृषी कायद्यांना ठोस आकार दिला. या सुधारणांमुळे शेतकरी बंधनमुक्त होणार असून, नवीन हक्क, नवीन संधीही शेतकर्‍यांना उपलब्ध होणार आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ कार्यक्रमात बोलत होते. पंतप्रधानांनी या कार्यक्रमात कृषी कायद्याला होत असलेला विरोध, कोरोना संकट आणि शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं. मी एक चांगली बातमी सांगत आहे. आई अन्नपूर्णा देवीची मूर्ती कॅनडाहून परत आणण्यात आली आहे. याबद्दल मी कॅनडा सरकारचे आभार मानतो, असं सुद्धा मोदींनी अधोरेखित केलं आहे. कृषी कायद्यांमुळे शेतकर्‍यांच्या अडचणी संपू लागल्याचेही मोदी म्हणाले आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या जितेंद्रचाही उल्लेख केला. त्याने मक्याची शेती केली आहे. व्यापार्‍यांनी त्याच्या मालाची किंमत 3 लाख 32 हजार निश्चित केली होती. त्याला 25 हजार रुपयांचा अ‍ॅडव्हान्सही मिळाला. परंतु उर्वरित पैसे चार महिन्यांपर्यंत दिले गेले नाहीत. त्यानंतर जितेंद्रने नव्या कायद्याच्या मदतीने सर्व पैसे मिळवले, असा उल्लेखही मोदींनी केला आहे. नव्या कायद्यांतर्गत पीक खरेदीनंतर शेतकर्‍याला तीन दिवसांत पूर्ण पैसे द्यावे लागतात. जर तसे केले नाही तर तक्रार दाखल करता येते. एसडीएमलाही शेतकर्‍यांची तक्रार एका महिन्यात निकाली काढावी लागणार असल्याचेही मोदींनी सांगितले आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 30 नोव्हेंबरला होणार्‍या गुरुनानक देव यांच्या 551व्या प्रकाश पर्वाचा उल्लेख केला. मोदी म्हणाले की, गुरुग्रंथ साहिबमध्ये असे म्हटले आहे की, ‘सेवक को सेवा बन आई’, म्हणजे सेवकाचे काम सेवा करणे. एक सेवक म्हणून आपल्याला खूप काही करण्याची संधी मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

कोरोना लसीच्या तयारीचा आढावा

कोरोना विषाणूच्या संकटाला तोंड देण्यासाठी लस तयार करण्याचे काम जगभरात सुरू आहे. अनेक देशांमध्ये लसीचे काम अंतिम टप्प्यात आहे. भारतातही लस शोधण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. पंतप्रधान मोदींनी शनिवारी देशातील 3 प्रमुख प्रयोगशाळांना भेट देऊन तेथील लसीची माहिती घेतली. पंतप्रधान मोदींनी कोरोना लसीच्या आधारे पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथे भेट दिली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -