घरदेश-विदेशसोमवारपासून Income Tax चे नवे पोर्टल होणार सुरु, १८ जूनला लाँच होणार...

सोमवारपासून Income Tax चे नवे पोर्टल होणार सुरु, १८ जूनला लाँच होणार Income Tax पेमेंट सिस्टम

Subscribe

नवीन पोर्टलमधील महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये

केंद्रीय अर्थ मंत्रालयातर्फे सोमवारपासून ( ७ जून २०२१) नवीन Income Tax पोर्टल लाँच केले जाणार आहे. या नव्या पोर्टलच्या माध्यमातून करदात्यांना अधिक सुटसुटीत आणि सोप्प्या पद्धतीने सर्व माहिती आणि कर भरता येणार आहे. याबाबतची माहिती देताना केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डने (CBDT) सांगितले की, www.incometax.gov.in हे इनकम टॅक्सचे नवीन पोर्टल सोमवारपासून सुरु होणार असून १८ जूनपासून या पोर्टलवर नवीन टॅक्स पेमेंट सिस्टम लाँच होणार आहे. या पोर्टलसह Income Tax चा नवीन अ‍ॅप देखील सुरु होणार आहे. सध्याच्या Income tax पोर्टलवर मुदतीच्या तारखेपर्यंत टॅक्स भरताना अनेक अडचणी येत असल्याने हे नवे पोर्टल लाँच करण्यात आले.

CBDT ने एक आदेश जाहीर करत म्हटले आहे की, Income tax चे नवे पोर्टल उद्यापासून (६ जून २०२१) पासून सुरु होणार आहे. या पोर्टलवर टॅक्स पेमेंटची नवीन सिस्टम आणि मोबाईल अ‍ॅपमध्ये एडवांस टॅक्स जमा करण्याची तारीख १८ जूनपासून अ‍ॅटिव्ह होणार आहे. या पोर्टलमुळे करदात्याला त्रास सहन करावा लागणार नाही. सध्या अस्तित्त्वात असलेले पोर्टल योग्य प्रकारे कार्यरत असले तरी नियोजित तारखेच्या काळात त्याच्यावर काम करताना अडचणी येत होत्या. कागदपत्रे अपलोड करण्याची क्षमता कमी, ऑडिट अहवाल भरणे, मूल्यांकन किंवा नोटिसांना प्रत्युत्तर देताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्याचप्रमाणे अनेक करदात्यांना हे पोर्टल गोंधळून टाकणारे होते. परंतु नवे पोर्टल लाँच झाल्यानंतर त्यातील बारकावे समजण्यासाठी वेळ लागू शकतो. कारण यातील नवे फिचर्स करदात्याला समजणे आवश्यक आहेत. इनटॅक्सची नवीन सिस्टमसह अनेक फिचर्स लवकरचं रिलीज केले जातील.

- Advertisement -

नवीन पोर्टलमधील महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये

१) Income tax चे नवीन पोर्टल करदात्यांच्या प्राप्तिकर विवरणपत्रांवर (Income Tax Return) त्वरित प्रक्रिया करू शकते. त्यामुळे करदात्यांना परतावे जलद मिळतील.

२) सर्व इंटरअ‍ॅक्शन्स, अपलोड किंवा प्रलंबित प्रक्रिया एकाच डॅशबोर्डवर दिसतील, ज्यामुळे करदात्यांना ते व्यवस्थित पूर्ण करता येईल.

- Advertisement -

३) डेस्कटॉपवर दिसणारी पोर्टलची सर्व कार्ये मोबाइल अ‍ॅपवरदेखील उपलब्ध असतील, त्यामुळे मोबाइलवर कधीही ते वापरण्याची सुविधा मिळेल.

४) विनामूल्य आयटीआर प्रिपरेशन सॉफ्टवेअर (ITR preparation software) ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीनं उपलब्ध असेल आणि यात इंटरअ‍ॅक्टिव प्रश्न असतील जेणेकरुन करदात्यांना सहजपणे त्यांचे आयटीआर दाखल करता येतील. यात आधीच माहिती भरलेली असेल आणि यामुळे करदात्यांचे डेटा एंट्रीचे काम मोठ्या प्रमाणात कमी होईल.

५) नवीन पोर्टलवर नवीन ऑनलाइन कर भरण्याची व्यवस्था असेल आणि  पेमेंटचे अनेक नवीन पर्याय दिले जातील. यामध्ये नेटबँकिंग, यूपीआय, क्रेडिट कार्ड आणि आरटीजीएस, एनईएफटीसारखे यांचा समावेश असेल. करदात्यांना कोणत्याही बँकेतून कर भरता येईल.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -