घरताज्या घडामोडीनिर्भयाच्या दोषींना उद्या पहाटे फाशी देणार!

निर्भयाच्या दोषींना उद्या पहाटे फाशी देणार!

Subscribe

निर्भयाच्या दोषींना अखेर उद्या पहाटे ५.३० वाजता फाशी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यातल्या आरोपीने केलेली आव्हान देणारी याचिका फेटाळल्यानंतर त्यांना फाशी दिली जाणार असल्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

दिल्लीमध्ये चालत्या बसमध्ये एका तरुणीवर पाशवी बलात्कार झाला आणि त्यामुळे आख्खा देश पेटून उठला. देशभर झालेल्या आंदोलनांमधून त्या तरूणीला निर्भयाची उपमा मिळाली. १३ दिवसांनंतर रुग्णालयात उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला आणि उभा देश हळहळला. पण तिच्या मृत्यूनंतर तब्बल ८ वर्षांनी निर्भयाला न्याय मिळण्याची वेळ जवळ आली असून उद्या म्हणजेच २० मार्च रोजी पहाटे ५.३० वाजता निर्भयाच्या चारही दोषींना फाशी दिली जाणार आहे. ५ मार्च रोजी त्यांच्या नावे शेवटचं डेथ वॉरंट पतियाला कोर्टाने काढलं होतं. त्यानंतर देखील त्यांच्यापैकी एकाने राष्ट्रपतींकडे दया याचिका तर एकाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. मात्र, राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळल्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाने देखील आव्हान देणारी याचिका फेटाळली असून आता उद्या पहाटे ५.३० वाजता त्या चौघांनाही फाशी दिली जाणार आहे.

- Advertisement -

चार दोषींपैकी मुकेश सिंहने सर्वोच्च न्यायालयात दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. ‘गुन्हा घडला, तेव्हा मी तिथे नव्हतोच’, असा दावा करणारी याचिका मुकेश सिंहने दिल्ली उच्च न्यायालयात केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर या निकालाला आव्हान देणारी याचिका त्याने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. मात्र, ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर फाशीवर शिक्कामोर्तब झालं आहे. याआधी देखील दोन वेळा डेथ वॉरंट काढून देखील त्यांची फाशी पुढे ढकलावी लागली होती. आता मात्र ५ मार्च रोजी जारी करण्यात आलेल्या डेथ वॉरंटनुसार त्यांना २० मार्च रोजी म्हणजेच उद्या फाशी दिली जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -