घरदेश-विदेशअर्थमंत्री सीतारामण यांची आज सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांसह बैठक, गुंतवणूकीसह अनेक...

अर्थमंत्री सीतारामण यांची आज सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांसह बैठक, गुंतवणूकीसह अनेक मुद्द्यांवर होणार चर्चा

Subscribe

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची सोमवारी म्हणजे आज सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांसह एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहेत. या बैठकीत देशाच्या विकासाला चालना देण्यासाठई सुधारणा केंद्रित व्यवसायिक वातावरण निर्माण करणे आणि गुंतवणूकदरांना आकर्षित करण्यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. अर्थ मंत्रालयाने एक ट्विट केले आहे, ज्यात म्हटले आहे की, १५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या ऑनलाईन बैठकीत अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी आणि भागवत कराड देखील सहभागी होतील. याशिवाय केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांचे सचिव, राज्यांचे मुख्य सचिव आणि वित्त सचिवही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

“गुंतवणूक वाढवण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे हा बैठकीतील चर्चेचा विषय असेल,” असे मंत्रालयाने म्हटले आहे. याशिवाय आर्थिक वृद्धी, सुधारणा, गुंतवणुकीला चालना देण्यासाठी आणि सुधारणांवर आधारित व्यवसायिक वातावरण निर्माण करण्यासाठीच्या उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर अर्थव्यवस्थेचे जलद पुनरुज्जीवन आणि भांडवली खर्च वाढवण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या प्रयत्नांचा लेखाजोखा मांडण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे. यापूर्वी केंद्रीय वित्त सचिव टी.वी सोमनाथन यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की, चर्चेचा केंद्रबिंदू राज्यस्तरीय समस्या, संधी आणि आव्हाने असतील ज्याद्वारे आपण उच्च गुंतवणूक आणि वाढ साध्य करू शकतो.

सचिव म्हणाले होते, “सरकार भांडवली खर्च करत आहे आणि खाजगी क्षेत्राकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, परंतु अद्याप  मोठ्या प्रमाणात गुंतवणुक होणे गरजेचे आहे.

- Advertisement -

गेल्या आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये कोरोना महामारीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेत ७.३ टक्क्यांची घसरण झाली होती. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या एप्रिल ते जून या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था २०.१ टक्के दराने वाढली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत ६४ अब्ज डॉलरची थेट विदेशी गुंतवणूक (FDI) देशात आली आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -