घरताज्या घडामोडीPF व्याजदर जैसे थे, सामान्यांना दिलासा

PF व्याजदर जैसे थे, सामान्यांना दिलासा

Subscribe

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने(EPFO)ने २०२०-२१ चे व्याजदर जैसे ते वैसे ठेवले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला असून २०१९-२० प्रमाणेच ईपीएफओच्या निधीवर लाभार्थ्यांना ८.५० टक्के व्याज मिळणार आहे.

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांनी निधीतील रक्कम काढली. तर काही कंपन्यांनी कमी योगदान दिले. यामुळे यावर्षी व्याजदरात कपात होण्याची शक्यता होती. पण आज कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे व्यवस्थापन पाहणाऱ्या केंद्र संघटनेच्या विश्वस्त मंडळाने व्याजदरात बदल करण्यात येणार नसल्याची घोषणा केली. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने २०१८-१९ पासून व्याजदरात कपात करण्याचे धोरण अवलंबले होते. यामुळे २०२०-२१ मध्येही व्याजदरात कपात केली जाईल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला होता.

- Advertisement -

 

 

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -