घरदेश-विदेश९० वर्षीय आजोबांनी ७२ वर्षांनतर घेतली पहिल्या पत्नीची भेट

९० वर्षीय आजोबांनी ७२ वर्षांनतर घेतली पहिल्या पत्नीची भेट

Subscribe

कुन्नूर येथील नारायणन नंबियार (९०) हे तब्बल ७२ वर्षांनंतर आपली पहिली पत्नी सरदा (८६) यांना भेटले आहे. तुरुंगवास झाल्यामुळे मागील अनेक वर्षे हे एकमेंकांना भेटले नाहीत.

बॉलिवूड चित्रपटांमध्ये नेहेमीच प्रेम कथांची चलती राहिली आहे. एकाच प्रेमप्रकरणाच्या वेगवेगळ्या बाजू दाखवून अनेक चित्रपट प्रदर्शित करण्यात आले आहे. तरुण वयात केलेले प्रेम हे म्हातारपणात मिळण्याच्या घटना शक्यतो पडद्यावरच बघायला मिळतात. तामिळनाडूच्या कुन्नूर येथे अशीच एक लव्ह स्टोरी बघायला मिळाली. कुन्नूर येथील नारायणन नंबियार (९०) हे ७२ वर्षांनंतर आपली पहिली पत्नी सरदा (८६) यांना भेटले आहे. या दोघांनी  १९४६ साली लग्न केलं होतं. मात्र कौटुंबिक वादामुळे त्यांना विभक्त व्हावे लागले. अखेर जीवनाच्या शेवटी हे दोघे एकमेकांना भेटले. अनेक वर्षांनंतर आपल्या पहिल्या प्रियकराला बघून सरदा या भाऊक झाल्या होत्या. एकमेकांना भेटल्यानंतर अखेर नारयणनचेही डोळे पाणावले. या वयात भेटल्यानंतर आपली आयुष्यात राहिलेली एक इच्छा पूर्ण झाल्याचे मत नारायणन यांनी व्यक्त केले आहे.

आठ महिन्यांची लव्ह स्टोरी

नारायणन आणि सरदा हे स्वातंत्रपूर्व काळात कुन्नूर गावात राहत होते. सरदा ही नारायणन यांची चूलत्यांपैकी एक होती. १९४६ मध्ये या दोघांनी कोणालाही न सांगता लग्न केले होते. लग्नच्या वेळी सरदा या १४  वर्षाच्या होत्या तर नारायणन १८ वर्षाचे होते. स्वातंत्रपूर्व काळात लपून लग्न करणे ही एक मोठी गोष्ट असल्याने त्यांनी ही गोष्ट लपवून ठेवली होती. या ठिकाणी शेतकऱ्यांनी उठाव केला होता. या उठावामुळे त्यांना अटक करण्यात आले होते. त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. नारयणन तुरुंगात गेल्यानंतर काही वर्षांनी सरदा यांनीही लग्न केले. यानंतर हे दोघे एकमेंकांना भेटले नाहीत.

- Advertisement -

मेहूणीच्या घरी आल्यावर झाली भेट

नारायणन हे आपल्या मेहूणी लक्ष्मी अम्माच्या घरी आले होते. त्यावेळी सरदा ही याच ठिकाणी राहत असल्याचे त्यांना समजले. अखेर त्यांनी सरदाची भेट घेतली. सरदाच्या ही घरच्यांनी नारायणन यांचे स्वागत केले. एकमेंकांना भेटून त्यांनी जून्या आठवणींना उजाळा दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -