घरदेश-विदेश'मला नाही तर तपासालाच क्वॉरंटाईन केले'; बिहार पोलीस अधिकाऱ्याची प्रतिक्रिया

‘मला नाही तर तपासालाच क्वॉरंटाईन केले’; बिहार पोलीस अधिकाऱ्याची प्रतिक्रिया

Subscribe

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी मुंबईत तपासासाठी आलेल्या बिहारच्या पोलीस अधिकाऱ्यांची आज क्वॉरंटाईनमधून सुटका झाली आहे. पाटणाचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांना गेल्या रविवारी मुंबई महापालिकेने गोरेगाव येथे क्वॉरंटाईन केले होते. हे बिहारहून तपासासाठी मुंबईत आले असल्यामुळे त्यांना केंद्राच्या नियमानुसार हातावर शिक्का मारत क्वॉरंटाईन केल्याचे पालिकेने म्हटले होते. दरम्यान, विनय तिवारी यांना पाचच दिवसात म्हणजे आज क्वॉरंटाईनमुक्त करण्यात आले आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना विनय तिवारी यांनी, मला नाही तर तपासालाच क्वॉरंटाईन केल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. आज सायंकाळच्या विमानाने ते पाटणाला परत जाणार असल्याचेही सांगितले जात आहे.

- Advertisement -

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत केससंबंधी पाटणाहून आलेल्या पोलीस अधीक्षक विनय तिवारी मुंबई महापालिकेने क्वॉरंटाईनमुक्त केले होते. रविवार, २ ऑगस्टपासून विनय तिवारी यांना पालिकेने गोरेगाव येथे क्वॉरंटाईन केले होते. मात्र आज त्यांना क्वॉरंटाईनमुक्त करण्यात आले आहे. त्यांच्यासह आणखी चार पोलीस अधिकाऱ्यांनाही क्वॉरंटाईनमुक्त केले आहे. विनय तिवारी यांना पालिकेने १४ दिवसांसाठी क्वॉरंटाईन केले होते. मात्र ५ दिवसातच त्यांना क्वॉरंटाईनमुक्त करण्यात आले आहे. मला पालिकेकडून मेसेज आला असून आपण क्वॉरंटाईनमुक्त होऊ शकता असे कळवण्यात आल्याचे विनय तिवारी यांनी म्हटले आहे.

हेही वाचा –

केरळच्या मुन्नारमध्ये भूस्खलन! ८० मजूर अडकले; ७ मृतदेह बाहेर काढले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -