घरदेश-विदेशजगन्नाथ मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले, मंदिर प्रवेशासाठी कोरोना चाचणी,लस घेणे अनिवार्य

जगन्नाथ मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले, मंदिर प्रवेशासाठी कोरोना चाचणी,लस घेणे अनिवार्य

Subscribe

 

ओडिशा राज्यामधील पुरीमध्ये स्थित जगन्नाथ मंदिराचे दरवाजे आता भाविकांसाठी खुले करण्यात आले आहेत. मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाने नवीन गाइडलाइन्सं जाहीर केली असून सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करत प्रत्येक भाविकाला दर्शन देण्यात येणार असल्याचे मंदिर प्रशासनाद्वारे सांगण्यात आले आहे. तसेच येत्या 23 ऑगस्टपासून सर्व भक्तांसाठी दर्शनाची परवानगी दिली जाणार आहे. कोरोना व्हायरसमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले होते. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार तसेच मंदिर प्रशासनाच्या माहितीनुसार पुरी नगर पालिका क्षेत्रमध्ये राहणाऱ्या लोकांना 20 ऑगस्ट पर्यंत दर्शनाची परवानगी देण्यात आली आहे. ( Odisha Jagannath temple are open for devotees, corona test, vaccination is mandatory for temple entry)

- Advertisement -

जगन्नाथ मंदिराच्या दर्शनासाठी प्रशासनातर्फे वेळ निश्चित करण्यात आला आहे. सकाळी सात वाजल्या पासून ते रात्री सात वाजेपर्यंत भाविकांसाठी मंदिर खुलं करण्यात येणार आहे. तसेच गावाबाहेरील भाविकांसाठी 23 ऑगस्ट पासून मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे.

यापुर्वी 11 ऑगस्ट रोजी मंदिरा प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या सूचनेत सांगण्यात आले होते की, मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यासाठी मुख्य प्रशासक डॉ. कृष्ण कुमार यांनी अध्यक्षांसोबत एक बैठक पार पडली. या बैठकीत मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुलं करण्याबाबत विस्तृत स्वरुपात चर्चा करण्यात आली. तसेच या चर्चेत कोरोना नियमांबाबत देखील बातचीत करण्यात आल्याचे समजतेय.

- Advertisement -

माहितीनूसार कोरोना व्हायरसच्या प्रसारामुळे 24 एप्रिल पासून श्री जगन्नाथ मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले होते. तसेच मंदिर पुन्हा सुरू करण्यासाठी जाहीर केलेली गाईडलाइन्स अंतर्गत भाविंकासाठी विकेंन्डच्या दिवसात तसेच प्रमुख सण,उत्सवाच्या दिवशी बंद करण्यात येणार आहे. इतकंच नाही तर राज्याबाहेरील भाविकांना 96 तासाच्या आत आरटी पीसीआर टेस्ट आणि कोव्हिड वॅक्सिन सर्टीफिकेट दाखवावे लागणार आहे. तरच मंदिरात प्रवेश दिला जाईल.


हे हि वाचा – Afghanistan: काबुलच्या भिंतीवरून महिलांचे चित्र हटवण्यास सुरुवात

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -