घरदेश-विदेशOmicron Variant : आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणावर ओमिक्रॉनचे संकट; जगभरात हजारो उड्डाणे रद्द

Omicron Variant : आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणावर ओमिक्रॉनचे संकट; जगभरात हजारो उड्डाणे रद्द

Subscribe

ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रभावामुळे सोमवारी जगभरातील सुमारे ३००० उड्डाणे रद्द करण्यात आली तर मंगळवारी आणखी ११०० उड्डाणे रद्द करण्यात आली.

जगभरात कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने कहर केला आहे. अमेरिका, ब्रिटनसह अनेक देशांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण सतत वाढत आहे. त्यामुळे अनेक देशांनी आता पुन्हा कठोर निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. युरोप आणि अमेरिकेत अनेक राज्यांतील कोरोना रुग्णसंख्या विक्रमी पातळीवर पोहोचल्यानंतर अनेक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. ख्रिसमस सेलिब्रिशेनच्या निमित्ताने जगभरातील अनेक पर्यटक प्रवासाला निघाले असतानाच ही उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. अचानक उड्डाणे रद्द झाल्याने आता प्रवाशांचा हिरमोड झाला आहे.

प्रवासाच्या दृष्टीने डिसेंबर महिना हा वर्षातील सर्वात व्यस्त काळ असतो. ख्रिसमस, न्यू ईअर सेलिब्रेशनसाठी देशातील अनेक नागरिक परदेशात जात असतात. मात्र यंदा या सेलिब्रेशनवरही कोरोनाचे संकट कायम आहे. येत्या शुक्रवारपासून जगभरातील सुमारे ११,५०० विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. तर हजारो उड्डाणे उशीराने सुरु आहेत. यावर अनेक विमान कंपन्यांचे म्हणणे आहे की, कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या वाढत्या प्रकरणांमुळे कर्मचाऱ्यांची कमतरता भासू लागली आहे.

- Advertisement -

तर या विमान उड्डाणांवर लक्ष ठेवणाऱ्या फ्लाइटवेअरच्या म्हणण्यानुसार, ओमिक्रॉन व्हेरिएंटचा जगभरातील आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर परिणाम दिसून आला आहे. यामुळे सोमवारी जवळपास ३००० उड्डाणे रद्द करण्यात आली तर मंगळवारी आणखी ११०० उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने सोमवारी लक्षणे नसलेल्या कोरोना प्रकरणांसाठी आयसोलेशनचा कालावधी १० ते ५ दिवसांपर्यंत कमी केला. यामुळे लोक लवकरात लवकर कामावर परतू लागतील आणि मनुष्यबळाची व्यापकता वाढेल.

- Advertisement -

अमेरिकेत कोरोना रुग्णसंख्येने जानेवारीमध्ये विक्रमी उच्चांक गाठण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. लसीकरण न झालेल्या लोकांची मोठी संख्या आणि चाचणीतील असुलभतेमुळे भीतीत आणखी भर पडत आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -